Vinayak Raut vs Pramod Jathar esakal
कोकण

लोकांच्या भविष्याची चिंता नसलेल्या खासदाराचं निवडणुकीत डिपॉझिट जप्त होईल; भाजप नेत्याची राऊतांवर टीका

कोकणच्या विकासासह रोजगार निर्मितीसाठी स्थानिक पातळीवर उद्योगनिर्मिती होणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

'लोकांच्या हाताला काम न देणारा आणि लोकांच्या भविष्याची चिंता न करणाऱ्‍या खासदाराचे आगामी निवडणुकीत मतदार डिपॉझिट जप्त करतील.'

राजापूर : कोकणच्या विकासासह रोजगार निर्मितीसाठी स्थानिक पातळीवर उद्योगनिर्मिती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनीही रिफायनरी प्रकल्पाची मागणी आपल्या नेतृत्वाकडे केली होती; मात्र, लोकांच्या भविष्याची चिंता नसलेले खासदार विनायक राऊतांनी (Vinayak Raut) त्याला विरोध केला, अशी टीका भाजपचे लोकसभा प्रभारी प्रमोद जठार (Pramod Jathar) यांनी केली.

कोकण विकासाची चिंता नसलेल्या खासदारांचे आगामी निवडणुकीत मतदारच डिपॉझिट जप्त करतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर जठार यांनी त्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, माजी तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, विद्यमान तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, अनिल करंगुटकर, स्वप्नील गोठणकर, अरविंद लांजेकर, सुयोगा जठार यांसह अन्य भाजप दाधिकारी उपस्थित होते. कोकण विकास आणि रोजगारनिमिर्ती हा अजेंडा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीला भाजप सामोरे जाणार असून, या निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, कोकणामध्ये रोजगार निर्मिती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने रिफायनरी प्रकल्पासारख्या प्रकल्पांची उभारणी होणे गरजेचे आहे. मात्र, त्यालाच विरोध केला जात आहे. आपण दूध डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपण नेहमीच रोजगार निर्मिती आणि आर्थिक सक्षमता याला प्राधान्य दिले आहे. अशाप्रकारे उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत यांनी रोजगारासाठी प्रयत्न केलेले नाही किंवा एखादा उद्योग कोकणात आणलेला नाही.

लोकांच्या हाताला काम न देणारा आणि लोकांच्या भविष्याची चिंता न करणाऱ्‍या खासदाराचे आगामी निवडणुकीत मतदार डिपॉझिट जप्त करतील. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी करताना केंद्र आणि राज्यशासनाच्या लोकाभिमुख विकासाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी राजापूर तालुका दौरा सुरू आहे. या दौर्‍यातून बूथ कमिट्या अधिक सक्षम करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

पक्ष देईल तो उमेदवार

आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार म्हणून अनेक इच्छुकांच्या नावाची राजकीय वर्तुळातून चर्चा केली सुरू आहे. याबाबत प्रमोद जठार यांनी पक्ष देईल तो उमेदवार, अशी आमची भूमिका असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT