Konkan Railway on electricity throughout the month kokan marathi news 
कोकण

Good News : कोकण रेल्वे महिनाभरात होणार सुरु

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी ते रोहा विद्युतीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्‍तांची (सीआरएस) तपासणी झाल्यानंतर महिन्याभरात या मार्गावरील गाड्या विजेवर चालतील, असे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. 
बुधवारी (ता. 10) सायंकाळी अनौपचारिक गप्पा मारताना पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कोकण रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणासह दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

विजेवर इंजिन चालवण्याची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली आहे. सीआरएसची चाचणी झाली की रत्नागिरी ते रोहा या भागात विजेवर गाड्या चालवण्यात येतील. सुरवातीला मालवाहतूक करणाऱ्या गाड्या चालवून पाहिले जाईल. त्यानंतर प्रवासी वाहतुकीला सुरवात केली जाईल. यासाठी लागणारी वीज महावितरणच्या ग्रीडमधून घेण्यात येणार आहे. संबंधितांशी करारही झालेला आहे. साधारणपणे 70 मेगावॅट वीज महिन्याला लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरीतून पुढे वेरणापर्यंतचे सुमारे 200 किमीहून अधिकचे काम पूर्ण होण्यासाठी जूनमध्ये उजाडेल. विजेवर चालणारी इंजिनेही येथे उपलब्ध ठेवली आहेत. 


कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांच्या दरासह नवीन गाडी सुरू करण्याचे निर्णय हे केंद्रस्तरावर होतात. रेल्वे मंत्रालयाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरू करण्यासाठी आदेश मिळालेले नाहीत. लोकल गाड्या अन्य रेल्वेमार्गावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेसाठीही सूचना येतील. रत्नागिरी रेल्वेस्थानकात प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या जातील, असे आश्‍वासन गुप्ता यांनी दिले. 

एक नजर... 
सीआरएसची चाचणी झाल्यावर सुरवात 
वीज महावितरणच्या ग्रीडमधून 
महिन्याला 70 मेगावॅट वीजेची गरज 
वेरणापर्यंतचे 200 किमीचे काम बाकी 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT