Railway 
कोकण

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या ; जाणून घ्या वेळापत्रक

चाकरमान्यांसाठी ‘मध्य, पश्चिम’कडून व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोकणात (Kokan)मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मध्य व पश्चिम (Central-West railway)रेल्वेने यंदा जादा गाड्या सोडल्या आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक कोकण रेल्वे प्रशासनाने जारी केले. कोरोनाचे नियम पाळून प्रवास करता येईल.

सप्टेंबरमध्ये धावणाऱ्या रेल्वेगाड्या अशा

गाडी ०१२३५- ता. ७ - सीएसएमटी (मुंबई) दुपारी १.१० ला सुटणार. परतीसाठी गाडी ०१२३६ सावंतवाडी रोड येथून ता. १० ला दु. २.३०. थांबे- दादर, ठाणे, पनवेल, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानक.

गाडी ०१२३७- पनवेल ते सावंतवाडी रोड, पनवेल येथून ता. ८ आणि ९ ला दु. २.१० ला सुटेल. परतीसाठी ०१२३८ गाडी सावंतवाडीवरून ८ आणि ९ सप्टेंबरला दु. २.३०. थांबे- राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानक.

गाडी- ०१२३९ लोकमान्य टिळक ते मडगाव ता. ५, ७ आणि ९ ला एलटीटीवरून पहाटे ५.३३ ला सुटणार. परतीसाठी ०१२४० ही गाडी त्याच दिवशी मडगाव येथून रात्री ८.३० ला सुटणार. थांबे- ठाणे, पनवेल, रोहा, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी.

गाडी ०१२४१- लोकमान्य टिळक ते कुडाळ ता. ३, ७ आणि १० एलटीटीवरून रात्री १२.४५ ला सुटेल. परतीसाठी गाडी ०१२४२ कुडाळ येथून ५, ८ आणि १२ ला दुपारी १२.१० ला सुटेल. थांबे- ठाणे, पनवेल, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

गाडी ०१२४३- पनवेल ते कुडाळ पनवेलहून ता. ४, ८, ११ ला रात्री १२.१५ ला सुटेल. परतीसाठी गाडी ०१२४४ कुडाळ येथून ३, ७ आणि १० सप्टेंबरला दुपारी १२.१० ला सुटेल. थांबे- रोहा, माणगाव, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग. पनवेल ते कुडाळ गाडी ०१२४५ पनवेलहून ता. ५, १२ ला ००: १५ ला सुटेल. त्याच दिवशी ११.२० ला कुडाळला पोचेल.

गाडी ०१२४६- कुडाळ- पनवेल. कुडाळ येथून ता. ४ आणि ११ ला दु. १२.१० ला सुटेल. थांबे- वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

गाडी ०१२४७- पुणे ते मडगाव. पुणे येथून ता. ८ ला सायंकाळी ६.४५ ला सुटेल. थांबे- लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी. परतीसाठी गाडी ०१२४८ करमाळी ते पुणे, ता. १० ला करमाळीहून दु. ३.१० ला सुटेल.

गाडी ०१२४९- पनवेल ते करमाळी, ता. १० ला पनवेल येथून रात्री १२.१५ ला सुटेल. थांबे- रोहा, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम. गाडी ०१२५० मडगाव येथून ता. ९ ला सकाळी ११.३० ला सुटेल.

दरम्यान, पश्चिम रेल्वेमार्गावरील चाकरमानी प्रवाशांना मुंबई सेंट्रल ते सुरथकल गाडी ८ आणि १५ सप्टेंबरला सुटेल.

गाडी ०९१८३- मुंबई सेंट्रल ते करमाळी- रात्री ११.५५ ला सुटेल. परतीसाठी गाडी ०९१८४ सुरथकल येथून ता. ९ आणि १६ ला रात्री ९.१५ ला सुटेल. थांबे - बोरिवली, वसई रोड, पनवेल, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी.

गाडी ०९१८५- मुंबई सेंट्रल ते मडगाव. मुंबई सेंट्रल येथून ता. ३, १०, १७ ला रात्री ११.५५ ला सुटेल. परतीसाठी गाडी ०९१८६ मडगाव येथून ता. ४, ११, १८ ला रात्री ८.३० ला सुटेल. बांद्रा ते मडगाव अशी

गाडी ०९१८७ बांद्रा येथून ता. ५, १२, १९ सप्टेंबरला रात्री ११.५५ ला सुटेल. परतीसाठी गाडी ०९१८८ मंडगाव येथून ६, १३ आणि २० ला रात्री ८.३० ला सुटेल. कुडाळ ते बांद्रा ०९१८९ ता. ९ आणि १६ ला बांद्रा येथून दुपारी २.४० ला सुटेल. परतीसाठी गाडी ०९१९ कुडाळ येथून ता. १० आणि १७ ला सकाळी सातला सुटेल. गाडी ०९१९१ बांद्रा येथून ता. ९ आणि १६ ला रात्री ११.५५ ला सुटेल. परतीसाठी गाडी ०९१९२ मडगाव येथून ता. १० आणि १७ ला रात्री ८.३० ला सुटेल.

अहमदाबाद- कुडाळ- अहमदाबाद साप्ताहिक विशेष गाडी अहमदाबाद येथून ता. ७ आणि १४ ला सुटेल. परतीसाठी कुडाळ येथून ता. ८ आणि १५ ला सकाळी सातला सुटेल. थांबे- बडोदरा, उधना, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग. विश्वामित्री ते कुडाळ- ता. ६, १३ व २० ला विश्वामित्री येथून सकाळी १० ला सुटेल. परतीसाठी गाडी ०९१४९ कुडाळ येथून ७, १४ आणि २१ ला सकाळी सातला सुटेल. मुंबई सीएसटीएम ते- सावंतवाडी रोड स्पेशल ता. ४ ला धावेल.

गाडी ०१२३१ - पनवेल ते- सावंतवाडी रोड स्पेशल गाडी ता. ४ ला धावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT