kokan railway  sakal
कोकण

Konkan Railway : कोकण रेल्वे अखेर २५ तासांनी रुळावर

बोगद्यासमोर रुळावर दरड कोसळून ठप्प झालेली कोकण रेल्वे वाहतूक २५ तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी संध्याकाळी सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

खेड, (जि. रत्नागिरी) - तालुक्यातील दिवाणखवटी येथे नातूनगर बोगद्यासमोर रुळावर दरड कोसळून ठप्प झालेली कोकण रेल्वे वाहतूक २५ तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी संध्याकाळी सुरू झाली. रविवारी (ता. १४) जुलैला सायंकाळी ६ च्या सुमारास दरड कोसळली होती.

सोमवारी सायंकाळी ४.३० ला लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाल्याचे प्रमाणपत्र रेल्वेच्या तांत्रिक टीमकडून देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मांडवी एक्स्प्रेस घटनास्थळावरून रवाना झाली.

कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटीनजीक रेल्वेरुळावर मातीचा भराव आल्याने कोकण रेल्वेमार्ग २४ तासांहून अधिक काळ ठप्प होता. सोमवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे रेल्वे रुळावरील दरड व चिखल बाजूला करण्याचे काम पूर्ण झाले. अनेक स्थानकांवर गाड्या थांबून ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

मातीचा भराव काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले; मात्र त्यासोबत आलेले दगडगोटे, झाडे यांचा समावेश असल्याने काम कठीण होते. भराव तीन ते चार तासांमध्ये हटवला जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, २० तास उलटूनदेखील भराव हटवण्यात यश आले नव्हते.

दिवाणखवटी हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असल्यामुळे काढण्यात येणारा भराव, चिखल तसेच मुसळधार पावसामुळे डोंगर परिसरातील सैल झालेली माती, पाणी व दगडगोटे पुन्हा-पुन्हा रेल्वेरुळावर येत राहिल्याने भराव वाढतच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

पुढील ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतोस? अर्जुन तेंडुलकरचं प्रांजळ उत्तर... सचिनसोबतच्या तुलनेवर म्हणाला, मला कोणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही

तिरछी टोपी वाले या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली ती अभिनेत्री झाली अचानक गायब ; सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT