कोकण

कोकण रेल्वेचे वेळापत्रक आजही कोलमडले 

सकाळ वृत्तसेवा

कणकवली - मार्गाच्या क्षमतेपेक्षा अधिक गाड्या सोडल्याने कोकण रेल्वे वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. मंगलोरहून मुंबईकडे जाणारी मुंबई एक्‍सप्रेस आज तब्बल बारा तास उशिराने धावत होती. त्यामुळे रात्री दहा वाजता रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्याबरोबर गणपती विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने बहुतांश गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यातच रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे ट्रॅकवर माती आल्याने कोकण रेल्वेवर परिणाम झाला होता. 

गणेश विसर्जनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियमित धावणाऱ्याही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबईकडे जाणारी मंगलोर ते मुंबई सीएसटीम मुंबई एक्‍सप्रेस रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी कणकवली रेल्वे स्थानकात येते. मात्र ही गाडी मंगलोर येथून रात्री दोन वाजता सोडण्यात आली. त्यामुळे कणकवली स्थानकात सकाळी 11 वाजता दाखल झाली. परिणामी या गाडीला आरक्षण असलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. रेल्वे स्थानकावर छप्पर नसल्याने प्रवाशांना एकाच ठिकाणी गर्दी करून उभे राहावे लागत आहे. 

कोकण रेल्वे मार्गावरील एलटीटी ते झाराप ही गाडी आज सहा तास उशिराने धावत होती. तसेच सावंतवाडी सीएसटीएम ही गाडी ही उशिराने धावत होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसाने उघडीप दिल्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Jadeja च्या पत्नीनेही दाखवलं खेळाचं कौशल्य; लहान मुलांसोबत खेळली कबड्डी अन् रस्सीखेच; पाहा Video

Thane Crime: तलाठी कार्यालय चोरी प्रकरण! तपासात धक्कादायक खुलासा उघड; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Shri Chhatrapati Sugar Factory : छत्रपतीच्या कामगारांना मिळाली १० टक्के वेतनवाढ; कामगारांनी केला जल्लोष

गणरायाच्या मिरवणुकीवर कडक बंदोबस्त, साध्या वेशात पोलिसांचे पथक गस्त घालणार अन्...; कशी असेल सुरक्षा?

Latest Marathi News Updates : करमाळा घटनेप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक

SCROLL FOR NEXT