Konkan Rajapur Mumbai Goa highway four lane work 
कोकण

कोकण : राजापुरातील रखडलेल्या कामाबाबत बैठक घेणार : रवींद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्गासंबंधी राजापूरमधील समस्या जाणून घेतल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, आमदार राजन साळवी, कोंढेतडचे माजी उपसरंच अरविंद लांजेकर यांनी एसटी डेपोसमोरील रखडलेल्या कामासह नदीपात्रातील गाळ आणि महामार्गासंबंधी समस्या श्री. चव्हाण यांच्यासमोर मांडल्या.

श्री. चव्हाण यांचे तालुक्यामध्ये आगमन झाल्यानंतर एसटी डेपोसमोर त्यांचे पदाधिकाऱ्‍यांनी स्वागत केले. त्यांनी एसटी डेपोसमोरील महामार्गाच्या रखडलेल्या कामासंबंधी माहिती देताना याकडे भुयारी मार्ग आवश्यक असल्याची मागणी केली.

श्री. चव्हाण यांनी यासंबंधी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्‍वासन केले. या ठिकाणी आमदार श्री. साळवी यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, विनय गुरव, संजय पवार आदींसह सेनेच्या पदाधिकाऱ्‍यांनीही भेट घेत महामार्गाच्या रखडलेल्या कामासंबंधी त्यांना माहिती दिली.

प्रश्‍नांकडे लक्ष वेधले..

शासकीय विश्रागृहावर आमदार साळवी यांच्यासह शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष हातणकर, भाजपचे कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी नदीपत्रातील साचलेला गाळ, शिळ-गोठणे दोनिवडे-चिखलगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधून घेतले. शीळ-गोठणेदोनिवडे पंचक्रोशीतील माजी सरपंच नामदेव नागरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर विचारे आदी उपस्थित होते. याठिकाणी संरक्षक भिंत व गाळ उपशाबाबत योग्य ती कार्यवाहीण्याचे चव्हाण यांनी आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT