konkan road transport ambet bridge  sakal
कोकण

आंबेत पुलाची कथा भाग २; पाचव्या क्रमांकाच्या पिलरसाठी लागले दीड वर्ष

आंबेत पूल ; बंदमुळे घराघरांत झळ, आठ महिन्यांपूर्वी दुरुस्ती

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : महाबळेश्वर, महाडचे पाणी हे काळ नदी व सावित्री नदीच्या महाड येथील संगमातून सावित्री खाडीवाटे अरबी समुद्राला मिळते. पाण्याचा प्रचंड दाब असणाऱ्या या खाडीत आंबेत-म्हाप्रळ दरम्यान पूलबांधणीचे शिवधनुष्य ३० डिसेंबर १९७२ला उचलण्यात आले. पुलाच्या निर्मितीच्या सहा वर्षांच्या कालावधीत दीड वर्षाचा कालावधी हा पाचव्या नंबरचा पिलर उभा केल्याचे जुनेजाणते लोक सांगतात. ज्या ठिकाणी हा पिलर उभा करण्यात येणार होता त्या ठिकाणी पाण्याचा जबरदस्त करंट आणि भोवरा आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अत्यंत गतिमान असतो. त्यामुळे अनेक अडथळे व अडचणींना सामोरे जात या पिलरची उभारणी करावी लागल्याचे सांगण्यात येते.

रस्त्यापासून पुलाचा सर्वांत उंचीचा म्हणजे ३०.४९७ मीटरचा हा पिलर आहे. निधीची उपलब्धता आणि अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर १६ फेब्रुवारी १९७८ ला पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम मुंबई विभाग रामचंद्र त्रिंबक अत्रे यांच्या हस्ते अखिल भारतीय संस्था माजी अध्यक्ष सीताराम बाळकृष्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कोकणच्या सर्वांगसुंदर भागाला मुंबईशी जोडण्यात यश आले.

मुंबई-पुणे महानगरांशी जोडल्या गेलेल्या या पुलामुळे मंडणगड, दापोलीकरांचे ४५ ते ५० किमीचे अंतर कमी झाले. मंडणगड, दापोलीचे दळणवळण वाढून विकासाला गती प्राप्त झाली. दोन्ही तालुक्यातील घराघरातील व्यक्तीच्या सुखदुःखाच्या घटनांशी जोडलेल्या या पुलाशी एक प्रकारचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे पुलाबाबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची थेट झळ दोन्ही तालुक्यातील घराघरात पोहचत आहे.

आठ महिन्यांपूर्वी महत्वाची दुरुस्ती

पुलाची देखरेख असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग महाडच्यावतीने किरकोळ डागडुजी करण्यात येत होती. महाड येथे सावित्री खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल मुसळधार पावसात २ ऑगस्ट २०१६ला कोसळला. यामध्ये दोन एसटी आणि तवेरा गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आणि ४० निष्पाप नागरिकांचे हकनाक जीव गेले. या अतिशय दुःखद घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये आंबेत पूल धोकादायक बनल्याने १० फेब्रुवारी २०२१ला दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला. जनप्रक्षोभ व्यक्त झाल्याने त्यासाठी तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११ कोटींचा निधी मंजूर केला. जंगल जेटीची व्यवस्था करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT