Amboli Ghat Konkan Tourism esakal
कोकण

Konkan Tourism : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटकांची संख्या रोडावली; काय आहे कारण?

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत (Amboli Ghat) आज कमी प्रमाणात पर्यटकांची गर्दी पहायला मिळाली.

सकाळ डिजिटल टीम

आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यामुळे आंबोलीचे वर्षा पर्यटन दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी बहरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तुलनेत आज धबधबा परिसरात पर्यटकांची हवी तशी गर्दी पहायला मिळाली नाही.

आंबोली : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत (Amboli Ghat) आज कमी प्रमाणात पर्यटकांची गर्दी पहायला मिळाली. शनिवारी सायंकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने धबधबे कमी प्रमाणात वाहत असल्याने काल रविवार सुटीचा दिवस असूनही पर्यटक रोडवल्याचे चित्र धबधबा (Waterfall) परिसरात दिसत होते. दिवसभरात काही प्रमाणात पर्यटकांची ये-जा सुरू होती.

जिल्ह्यात गुरुवारपासून (ता. २०) मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत होते. आंबोली परिसरातील धबधबेही मोठ्या क्षमतेने प्रवाहित झाले होते. आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यामुळे आंबोलीचे वर्षा पर्यटन दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी बहरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तुलनेत आज धबधबा परिसरात पर्यटकांची हवी तशी गर्दी पहायला मिळाली नाही. पावसाने कालपासून उसंत घेतल्याने काल व आज सुटीचा दिवस असूनही धबधबा परिसरात पर्यटक रोडवल्याचे चित्र आज दिसले.

धबधब्यांजवळ पर्यटकांची संख्या कमी प्रमाणात दिसत होती. दरम्यान, घाटातील मुख्य धबधब्याखाली जाण्यासाठी वनविभाग सावंतवाडी, वन परिक्षेत्र आंबोली यांच्याकडून १० रुपये तिकीट आकारणी करण्यात येत होती. गेली तीन वर्षे तिकीट आकारणी बंद होती. मात्र, सध्या महाराष्ट्र शासन वनखाते स्वतः तिकीट आकारणी करत आहे.

कमी पोलिस बंदोबस्त

सध्या ओरोस येथे पोलिस भरतीसाठी मैदानी सराव सुरू असल्याने आज घाट परिसरात पोलिस बंदोबस्त कमी होता. पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर, उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्यासह आंबोली पोलिस बंदोबस्ताचे काम पाहत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT