कोकण

Kokan Rain Update : हर्णै, पाळंदेतील जनजीवन विस्कळीत

नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते, प्रत्येकाच्या दारापर्यंत पाणी आले

राधेश लिंगायत

हर्णै : मुसळधार पावसामुळे (heavy rain) हर्णै, पाळंदे, मुरुड गावांतील (murud) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. गेले दोन दिवसात पावसाचे प्रमाण तसे कमी होते. परंतु मंगळवारी (15) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरा हर्णै लोखंडीमोहल्ला येथील रफिक बुरोंडकर यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे त्यांचे यामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान झाले.

मेमन कॉलनी, बंदरमोहल्ला या ठिकाणी घराच्या दारापर्यंत पाणी आले होते. हर्णैमधील मुख्य रस्त्यावरील शिवाजी चौकातून ब्राह्मणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात पाणी तुंबले होते. येथील नाल्यामध्ये कचरा अडकल्याने येथे पाणी तुंबले होते. वाहतुकीला रस्ता बंदच झाला होता. नाथद्वारनगरमध्ये देखील पाणीच पाणी झाले होते. नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले होते. प्रत्येकाच्या दारापर्यंत पाणी आले होते.

पाळंदेमध्ये मुख्य रस्त्याला लागूनच एका विकासकाने डोंगर पोखरायचे काम सुरू केले आहे. सध्या पाऊस असल्याने हे काम थांबले आहे. या डोंगरावरील माती या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर व समोर रस्त्याच्या विरुद्ध बाजूस राहणाऱ्या घरासमोरील अंगणात वाहून आली होती. दरम्यान, मुरुडमध्ये देखील खूपच पाणीपाणी झाले होते. सर्व पाखाड्यांना मोठमोठ्या ओढ्यांचे स्वरूप आले होते. मुरुडमधून कर्दे गावाकडे जाणाऱ्या तिठ्यावर माती वाहून आली होती. सकाळपासून हर्णै ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी गावातील सर्व ठिकाणची पाहणी करून जेथे शक्य होईल अशा ठिकाणी मदतकार्य देखील करत होते.

"गेले 15 दिवस सातत्याने नाल्यांची साफसफाई करून सुद्धा काही ठिकाणी पाणी तुंबले आहे. याचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल."

- ऐश्वर्या धाडवे, सरपंच, हर्णै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT