Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Rajarampuri, Shahupuri and Shivaji Peth See Heavy Footfall : कोल्हापूर शहरातील बहुतांश गणेशोत्सव देखावे सुरू झाल्याने राजारामपुरी, शाहूपुरी आणि शिवाजी पेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली.
Kolhapur Ganeshotsav

Kolhapur Ganeshotsav

esakal

Updated on

कोल्हापूर : गणेशोत्सवाला कलात्मक स्वरूप देणाऱ्या देखाव्यांना शहरात आजपासून प्रारंभ झाला. कुठे आकर्षक विद्युत रोषणाई, तर कोठे तंत्राच्या माध्यमातून केलेली विषयाची प्रभावी मांडणी, सजीव देखाव्यांनी संस्मरणीय केलेले ऐतिहासिक प्रसंग, असे भावोत्कट देखावे पाहण्यासाठी शहर रस्त्यावर लोटले.

सहकुटुंब देखावे पाहण्याचा आनंद अनेकांनी घेतला. देखावा पाहताना प्रेक्षकांनी दिलेली मनसोक्त दाद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही समाधानाची रेषा उमटवून गेली. राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठ या भागांत नागरिकांची गर्दी प्रचंड होती. रात्री ११ पर्यंत रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते.

घरातील गणपतींचे विसर्जन झाले की, दुसऱ्या दिवसापासून शहरातील सार्वजनिक मंडळांचे देखावे खुले होतात. या रितीप्रमाणे आज शहरातील मंडळांनी रात्री आठपासून देखाव्यांना प्रारंभ केला. काही मंडळांनी आकर्षक रोषणाई केली होती. संगीताच्या तालावर प्रकाशमान होणाऱ्या या विद्युत रोषणाईने अनेकांची मने जिंकली.

Kolhapur Ganeshotsav
Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

सजीव देखावा ही कोल्हापूरची ओळख ठळक करणाऱ्या मित्रप्रेम तरुण मंडळाने यंदा शिवचरित्रातील प्रसंगावर आधारित सजीव देखावा बनविला आहे. हा देखावा आजपासून सुरू झाला असून, येथे नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिलाली. रंकाळा टॉवर येथील वाघ नखे हा सजीव देखावा पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली की, तेथे वाहतूक कोंडी झाली होती.

नाथागोळे तालीम मंडळाची गुहा पाहण्यासाठी गर्दी होती. संभाजीनगर मित्र मंडळाच्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी संध्याकाळी सातपासूनच गर्दी होती. काही मंडळांच्या मूर्ती प्रेक्षणीय आहेत, तर काही जणांनी पौराणिक, सामाजिक देखावे बनविले असून, दृक-श्राव्य माध्यमातून त्यांचे सादरीकरण केले आहे.

राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावरही देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. येथील आकर्षक देखाव्यांनी नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. उत्तरेश्वर पेठेतील मस्कुती तलाव मित्र मंडळाने अमरनाथ गुहेचा देखावा केला आहे. येथे उच्चांकी गर्दी झाली असून, देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी रांग लागली.

येथील झुलता पूलही आकर्षणाचे केंद्र ठरला. निवृत्ती चौक तरुण मंडळानेही दृक-श्राव्य माध्यमातून देखावा सादर केला. हा देखावा पाहण्यासाठीही नागरिकांनी या परिसरात गर्दी केली होती. उमा टॉकीजजवळील पूल गल्ली मित्र मंडळाने अरण्यातील गणपती ही संकल्पना मांडली असून, नागरिकांनी त्यालाही पसंती दिली आहे. रात्री १२पर्यंत देखावे सुरू होते.

Kolhapur Ganeshotsav
Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

खाऊ गल्ल्या गजबजल्या

शहरातील बहुतांशी सर्व खाऊ गल्ल्यांत तरुणाईने ठाण मांडले होते. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी खाद्य पदार्थांची विक्री सुरू होती. विविध पदार्थांचा आस्वाद घेत नागरिक येथे रेंगाळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com