कोकण

मुंबई-गोवा क्रूझची कोकणला प्रतीक्षाच

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-गोवा क्रूझ सेवेला अखेर मुहूर्त मिळाला. ११ ऑक्‍टोबरला पहिली क्रूझ मुंबईहून गोव्याला प्रयाण करणार, मात्र ही क्रूझ रत्नागिरीत थांबणार नाही. त्यासाठी आवश्‍यक सुविधा बंदरांत उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे क्रूझसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तांत्रिक अडचणींमुळे जानेवारी २०१८ मध्ये क्रूझ सेवा सुरू करण्याचा मुहूर्त पोर्ट ट्रस्टला पुढे ढकलावा लागला. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यातील तारीख निश्‍चित करण्यात आली. मुंबई-गोवा मार्गावर या क्रूझच्या चाचण्याही यशस्वी झाल्या. आवश्‍यक सर्व परवानग्यांची पूर्तताही झाली. मात्र, कोकणात थांबा देण्याच्या निर्णयावर अद्यापही विचार सुरूच आहे. जयगड, भगवती, दाभोळ या ठिकाणी क्रूझला थांबे देण्याची मागणी रत्नागिरीतून आहे. तसा प्रस्तावही पाठविलेला आहे.

मुंबई-गोवा क्रूझ सेवेमुळे कोकणातील पर्यटन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचणार आहे. मात्र, या क्रूझला पूरक सुविधा रत्नागिरीत बंदरावर उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची तरतूद केली. 
- ॲड. विलास पाटणे
, रत्नागिरी

क्रूझ पर्यटनासाठी सुरू होत आहे. त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बंदरांवर आवश्‍यक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील बंदरांवर सध्या थांबा मिळणे कठीण आहे. सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राकडून ८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

दृष्टिक्षेपात क्रूझ

  •  एका क्रूझची क्षमता ३०० प्रवासी 
  •  प्रवास भाडे सात हजार रुपये 
  •  तिकीट दरात नाश्‍ता, जेवणही  
  •  क्रूझवर स्वीमिंग पूल, बार, रेस्टॉरंट, कॉफी शॉप 
  •  क्रूझ सकाळी मुंबईहून गोव्याला पोचेल 
  •  एका दिवसाच्या मुक्कामानंतर पुन्हा मुंबईत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT