कोकण

'मी शब्द पाळणारा कार्यकर्ता, 5 कोटीपैकी नवा पैसा शासनाकडून परत घेणार नाही'

चंद्रशेखर जोशी

कुणबी समाजोन्नती संघाला शासनाने दिलेल्या ५ कोटी निधीपैकी एक नवा पैसाही शासनाकडून परत घेतला जाणार नाही

दाभोळ : मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता असून कुणबी समाजोन्नती संघाला शासनाने दिलेल्या ५ कोटी निधीपैकी एक नवा पैसाही शासनाकडून परत घेतला जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कुणबी समाजोन्नती संघाच्या मुलुंड येथील जागेवर विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाकडून कुणबी समाजोन्नती संघाच्या मागणीनुसार राज्य शासनाने ५ कोटी रुपयांची मदत दिली. मदतीचा धनादेश कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपूर्द केला.

यावेळी व्यासपीठावर रायगडचे खासदार सुनील तटकरे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बारे, संदीप राजपुरे, राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव होते. कुणबी समाजोन्नत्ती संघाची शतकमहोत्सवी वाटचाल सुरु असून बँ. अ.र. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असताना कुणबी समाजोन्नती संघाला मुलुंड येथे विद्यार्थी वसतिगृह बांधण्यासाठी एक भूखंड देण्यात आला होता. गेली अनेक वर्षे हा भूखंड तसाच पडून होता. मात्र यावेळी संघाचे पदाधिकारी व दापोलीचे संदीप राजपुरे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक सहकार्य करावे अशी विनंती केली होती. ती मान्य करून राज्याच्या अर्थसंकल्पात विद्यार्थी वसतीगृहाची इमारत बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली होती. गेली अनेक वर्षे कुणबी समाजाच्या मुंबईतील विद्यार्थी वसतिगृहाचा प्रश्न या निधीमुळे सुटला असून यामुळे समाज आनंदी झाला आहे. या इमारतीमध्ये १२६ विद्यार्थी राहतील अशी सुविधा असणार आहे. कुणबी समाजातील विद्यार्थांना मुंबईत राहून आयोगाच्या आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार असून शासकीय सेवेमध्ये या समाजातील विद्यार्थ्याचा टक्का वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती संदीप राजपुरे यांनी दिली. या कार्यक्रमाला रत्नागिरी  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, दापोली पंचायत समितीच्या सभापती सौ. योगिता बांद्रे, माजी सभापती चंद्रकांत बैकर, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, दौलतराव पोस्टुरे, दीपक खळे यांचेसह कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई तसेच ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.

काही विघ्नसंतोषी लोकांनी कुणबी समाजोन्नती संघाच्या विद्यार्थी वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी ५ कोटी रुपये मंजुर केल्याच्या शासन निर्णयातील तृटी काढून दिलेले पैसे शासन परत घेणार अश्या वावड्या समाजमाध्यमातून उठवल्या होत्या. संदीप राजपुरे यांनी शासन आदेशातील तृटी व होणारी चर्चा उपमुख्य मंत्री अजित पवार यांचे निदर्शनास आणून दिल्यावर अजित पवार यांनी दिलेल्या निधीतील एक नवा पैसाही शासन परत घेणार नसल्याची घोषणा या कार्यक्रमात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT