lack of funds for development of sindhudurg district 
कोकण

अरेरे....सिंधुदुर्गच्या विकासाला निधीचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडील निधीला 65 टक्के कात्री लावली आहे. त्यामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनला केवळ 47 कोटी 19 लाख रुपये एवढाच निधी प्राप्त होणार आहे. या निधीतील 25 टक्के निधी कोरोना उपचार आणि अनुषंगिक कामांसाठी खर्च करण्याचे बंधन आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून आणखी 11 कोटी 79 लाख रुपये निधी अजून कमी होणार आहे. परिणामी या वर्षी जिल्ह्याच्या विकासाचा गाडा जाग्यावरच थांबणार आहे. 

जिल्हा नियोजन 2020-21 आराखडा 147 कोटींचा बनविण्यात आला होता. मार्चमध्ये कोरोना विषाणूने देशात प्रवेश केल्यामुळे शासनाचा सर्वाधिक खर्च त्या संदर्भातील उपचार, उपाय योजनांवर केला आहे. त्याचवेळी या आर्थिक वर्षात राज्य शासनाने सर्वच खर्चाला 67 टक्के कात्री लावत केवळ 33 टक्के निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे जिल्हा नियोजनच्या आराखड्याला 65 टक्के कात्री लावली आहे. 

2020-21 आर्थिक वर्षासाठीच्या 147 कोटींच्या आराखड्यास शासनाने मंजुरी सुद्धा दिली होती; पण शासनाने मंजूर केलेला निधी 100 टक्के न देता 35 टक्केच देण्याचे निश्‍चित केल्याने यातील 47 कोटी 19 लाख एवढीच रक्कम मिळणार आहे. त्यामुळे 99 कोटी 81 लाख निधीला जिल्ह्याला मुकावे लागणार आहे. 

नवीन कामे नाहीच 
शासनाने 35 टक्के निधी देताना अनेक निर्बंध घातले आहेत. या निधीतून मागील वर्षात सुरू झालेल्या कामांचे केवळ दायित्व देता येणार आहे. नवीन कामांना मंजुरी देता येणार नाही, असे स्पष्ट निर्बंध आहेत. 35 टक्केनुसार मिळणाऱ्या 47 कोटी 19 लाख रकमेतील 14 कोटी 30 लाख रुपये निधी जिल्हा नियोजनला प्राप्त झाला आहे. 

25 टक्के आरोग्यावर खर्च 
राज्य शासनाने 35 टक्के रक्कम देतानाच यातील 25 टक्के रक्कम कोविड 19 साठी किंवा आरोग्याच्या सुविधेसाठी खर्च करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे 47 कोटी 19 लाखमधील 11 कोटी 79 लाख एवढी 25 टक्के रक्कम आरोग्यासाठी खर्च होणार आहेत. परिणामी 35 कोटी 4 लाख रुपये दायित्व यासाठी रक्कम शिल्लक राहणार आहे. 

गतवर्षी 98 टक्के रक्कम खर्च 
2019-20 या आर्थिक वर्षात 225 कोटींचा आराखडा मंजूर होऊन सर्व निधी उपलब्ध झाला होता. त्यातील 98 टक्के निधी खर्च झाला आहे. बीडीएसला समस्या निर्माण झाल्याने केवळ 4 कोटी 91 लाख रुपये निधी मागे गेला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT