Lad Kadam Kande In Rajapur Sabhapati Race Ratnagiri Marathi News  
कोकण

राजापूर पंचायत समिती सभापतिसाठी 'या' तिघीत रस्सीखेच 

सकाळ वृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या राजापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या अनुभवी सदस्यांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. बहुमत असलेल्या सत्ताधारी सभापतिपदासाठी तीन महिला तर, उपसभापती पदासाठी दोन सदस्य इच्छुक असून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी दिली. 

सभापती आणि उपसभापती पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची साऱ्यांना उत्सुकता लागली आहे. सभापतीपदाची निवडणूक सोमवारी (ता. 30) होणार आहे. बारा सदस्यसंख्या असलेल्या शिवसेनेचे नऊ सदस्य असून या बहुमताच्या जोरावर पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेली अडीच वर्ष सभापती आणि उपसभापतीपद शिवसेनेकडे राहिले आहे. आगामी अडीच वर्षासाठी सभापतीपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यासाठी सभापतीपदासाठी शिवसेनेकडून विशाखा लाड, करूणा कदम आणि प्रमिला कानडे या इच्छुक आहेत. उपसभापती पदासाठी ज्येष्ठ सदस्य प्रकाश गुरव आणि उन्नती वाघरे इच्छुक आहेत. त्यांच्यामधून सभापती आणि उपसभापतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केली जाणार आहे. 

सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या तीनही सदस्यांकडे प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. विशाखा लाड आणि करूणा कदम यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून सभागृहात या वेळी पहिल्यांदाच प्रवेश केला असला तरी, गेल्या अडीच वर्षातील कामकाजाचा अनुभव आणि यापूर्वी सरपंच म्हणून कामकाजाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. प्रमिला कानडे या पंचायत समिती सदस्य आहेत. उपसभापतीपदासाठी इच्छुक ज्येष्ठ सदस्य प्रकाश गुरव यापूर्वी पंचायत समितीचे उपसभापती आहेत. 

बहुमतामुळे सभापती शिवसेनेचाच
राज्यामध्ये महाविकासआघाडी असली तरी, स्थानिक पातळीवर अशा प्रकारची आघाडी करण्याचे सध्या वरिष्ठांकडून कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे पंचायत समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये महाविकासआघाडी होणार नाही. बहुमत असलेल्या शिवसेनेचाच सभापती, उपसभापती होईल. 
- प्रकाश कुवळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT