ratnagiri sakal
कोकण

परदेशी अवकाशात दीपसंस्कृती आकाशकंदिल

पर्यावरणस्नेही आकाशकंदील; सुरवातीपासूनच ब्रॅंड विकसित करण्यावर भर

शिरीष दामले

रत्नागिरी : चिनी बनावटीच्या आकाशकंदिलाला पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. बाजारात सुरवातीला कमी प्रतिसाद मिळाला पण कंदिल ग्राहकांपर्यंत पोहोचले अन् फरक पडला. वितरकांचे आम्हाला फोन येऊ लागले. यातच आमच्या काही ग्राहकांनी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना कंदिल भेट दिला. तेथील लोकांना तो पसंत पडला. त्यांनी त्याबाबत माहिती घेतली. बाजारातून आमच्या उत्पादनाबद्दल माहिती घेतली आणि आमच्याशी संपर्क साधला. यातूनच गेली दोन वर्षे अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये आमचे कंदिल निर्यात होत आहेत. दीपसंस्कृती ब्रॅंडने परदेशात कोकणची मुद्रा उमटली याचा अभिमान वाटतो, असे उद्योजक नीलेश सुवारे यांनी सांगितले.

‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले की, मुंबईतही आम्ही मार्केटला उतरलो; मात्र स्पर्धेसाठी आम्ही किमती कमी केल्या नाहीत. आमच्या उत्पादन खर्चानुसारच किमती ठेवल्या. दर्जेदार आकाशकंदिल तेही पर्यावरणपूरक ही आमची भूमिका होती. मुंबईत मार्केटिंगसाठी पाटकर हे सतत मदत करतात. निर्यात वाढवण्यासाठी आम्ही अद्याप सोशल मीडिया अथवा इतर साधनांचा वापर सुरू केला नाही पण तोही विचारात आहे. ८ वर्षांपूर्वी काही वितरकांकडून आमचे आकाशकंदिल परदेशी गेले परंतु ते तेवढेच होते. गेल्या दोन वर्षांत मात्र निर्यात चांगली होत आहे. थेट परदेशात विक्री करत आहोत.

आकाशकंदिलाची आमची संकल्पना युनिक आहे असे सांगून सुवारे म्हणाले, त्याला चार यू पिन पुरतात.२०१० च्या दरम्यान सुवारेनी व्यवसाय सुरू केला तेव्हाच दीपसंस्कृती असे ब्रॅंडिंग केले होते हे विशेष आहे. ब्रॅंडिंगची कल्पना कशी काय आली, उत्पादन सुरू करतानाच ब्रॅंड विकसित करण्याचा विचार कसा काय केला विचारता सुवारे म्हणाले, यासाठी जे. जे. स्कूलमधील शिक्षण उपयोगी पडले. अनेक कंपन्यांचे लोगो, ब्रोशर, लेबल अशाचे डिझाईन करत असताना ब्रॅंडचे महत्त्व ठसले होते. त्यामुळे आपल्या ब्रॅंडच्या नावाने उत्पादन ओळखले गेले पाहिजे.

व्हाईट हाऊसमध्ये पोचावा

आकाशकंदिलाची डिझाईन बनवताना त्यात परंपरागत पद्धतीवर भर दिलेला आहे. एकूण २५ वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदिल आम्ही बनवतो. हे सारे डिझाईन मीच केले आहेत. त्यातील काही डिझाईन्स आता थोडी मागे पडली आहेत. बदल आवश्यकच असतो; मात्र कोणतेही डिझाईन आपल्या परंपरेशी फटकून नाही. ऑस्ट्रेलियासह अमेरिकेचे मार्केट आम्ही अधिकाधिक मिळेल यासाठी प्रयत्न करत आहोत. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी होते मग तेथे कोकणातील आमच्या ब्रॅंडचा आकाशकंदिल असावा असे स्वप्न आहे, असे सुवारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water News: मुंबईत पाणीकपात अलर्ट! १० आणि ११ मार्चला पाण्याचा मोठा तुटवडा; २४ तास राहणार खंडित, जाणून घ्या भागांची यादी...

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये मजुराचा मुलाने UPSC परीक्षेत उतीर्ण, IPS पदाला गवसणी

Success Story: जिद्दीच्या जोरावर आदित्य पोलिस उपनिरीक्षक; नीरा येथे मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण

IND vs NZ Final: संजू सॅमसनसोबतच्या Viral Video मागचं सत्य रोहित शर्माने सांगितलं; म्हणाला, मला माहित्येत, त्यावेळी कसे वाटते...

Success Story: दिव्यांगत्वावर मात करत अमीरची सीए पदावर मोहर; निकाल ऐकताच गलांडवाडीच्या इनामदार परिवाराला आनंदाश्रू

SCROLL FOR NEXT