०
० 
कोकण

सिंधुदुर्गातील ऊस संशोधन केंद्रासाठी तब्बल १२ वर्षांनी मिळाली जागा

एकनाथ पवार

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : नापणे येथील 17 एकर शासकीय जागा नियोजित ऊस संशोधन केंद्रासाठी दापोली कृषी विद्यापीठाकडे गुरूवारी हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळे संशोधन केंद्र उभारणीतील मोठा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला आता या जागेत आपल्या विविध उपक्रमांना सुरवात करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत असल्यामुळे भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नापणे येथे ऊस संशोधन केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी शासनाकडे केली होती. या ऊस संशोधन केंद्रासाठी नापणे येथील 17 एकर जागा मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर विद्यापीठ आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून गेली 12 वर्ष काम करीत होते. हे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. 

भाजप-शिवसेना युतीचे तत्कालीन कृषिमंत्र्यांनी नापणे येथील नियोजित ऊस संशोधन केंद्राच्या जागेला गेल्यावर्षी भेट दिली. त्यानंतर तत्काळ त्यांनी ही जागा संशोधन केंद्राला मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर जागा हस्तातंरण प्रकियेला गती मिळाली. या जमिनीचे मूल्यांकन 23 लाख 52 हजार 958 इतके करण्यात आले. ही रक्कम डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीने महसूल विभागाकडे भरणा केली. त्यानंतर ही जमीन विद्यापीठांकडे हस्तांतरण प्रकिया सुरू झाली; परंतु मार्चपासून कोरोनाच्या सावटात ही हस्तातंरण प्रकिया रखडली होती. 

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आता ही जमीन विद्यापीठाकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वैभववाडी तहसीलदारांना दिले. त्यानुसार तहसीलदार रामदास झळके यांनी फोंडाघाट संशोधन केंद्रांचे विजय शेट्ये यांच्याकडे हस्तांतरण आदेशाची प्रत दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, किशोर जैतापकर, मंडल अधिकारी पावसकर उपस्थित होते. 

संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT