Parshuram Ghat on Mumbai-Goa Highway esakal
कोकण

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातली धोकादायक दरड हटवली, पण 'या' मार्गावर मोठी कोंडी

परशुराम घाटातील (Parashuram Ghat) दुसऱ्या लेनचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

परशुराम घाटासह पायथ्याशी असलेल्या पेढे फरशीतिठा परिसरात महामार्गावर सध्या वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटातील (Parashuram Ghat) दुसऱ्या लेनचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असून, घाटात धोकादायक भागातील दरडही हटवण्यात आलेली आहे. या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, लवकरच दुसरी लेनही वाहतुकीस खुली होणार आहे.

त्याबरोबर रखडलेल्या पेढे फरशीतिठा येथील काँक्रिटीकरणाची एक लेन पूर्ण झाली असून, ती आठवडाभरात खुली करण्यात येणार आहे; मात्र येथे पर्यायी अरूंद रस्त्यामुळे आणखी आठवडाभर फरशीतिठा येथे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले असून, काम अजूनही पूर्णत्वास जात नाही. परशुराम घाटात तर अनेक अडथळ्यांचे डोंगर उभे राहिले. दरड हटवून लगतच्या डोंगरकटाईचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर आता आवश्यक तेथे संरक्षक भिंत उभारून नव्या वर्षाच्या सुरवातीलाच परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीस सुरू होईल, असा अंदाज येत आहे. दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

परशुराम घाटासह पायथ्याशी असलेल्या पेढे फरशीतिठा परिसरात महामार्गावर सध्या वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दिवसातून अनेकवेळा आणि विशेषतः सायंकाळच्या वेळेत येथे वाहतूककोंडी होते. त्या ठिकाणी आधी सर्व्हिस रोड करणे गरजेचे होते; परंतु त्या उलट आधी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले.

सर्व्हिस रोड करण्यात न आल्याने एका मार्गावर आणि त्यातही बेशिस्तपणे वाहनालक वाहने हाकत असल्याने वाहतूककोंडी दीर्घकाळ होत आहे. सध्या या वाहतूककोंडीने सारे हैराण झाले आहेत. सध्या येथील एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्णत्वास गेले असून, सध्या त्यावर पाणी मारणे सुरू आहे. आठवडाभरानंतर ही लेन वाहतुकीस खुली केली जाणार असल्याचे महामार्ग विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT