Lanja Nagarpanchayat 73 Percent Voting Ratnagiri Marathi News 
कोकण

लांजा नगरपंचायतीसाठी सरासरी 73 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा

लांजा ( रत्नागिरी ) - लांजा नगरपंचायतीच्या गुरुवारी (ता. 9) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 73 टक्के मतदान झाले. नगराध्यक्षपदासाठी पाच व नगरसेवकपदासाठी 58 अशा 63 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. शहरात मतदान प्रक्रिया शांततेत झाली. मतमोजणी शुक्रवारी (ता. 10) होणार आहे. 

पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सुमंत वाघधरे, शिवसेनेचे मनोहर बाईत, काँग्रेसकडून राजेश राणे तर अपक्ष उमेदवार म्हणून संपदा वाघधरे, रुपेश गांगण हे रिंगणात आहेत. यापैकी कोण नगराध्यक्षपदी विराजमान होणार, याकडे लांजावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपकडून अखेरच्या टप्प्यात नीलेश राणे यांना प्रचारात उतरल्याने या नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगत आली आहे.

दोन तासात 15.37 टक्के मतदान

लांजा नगरपंचायतीसाठी गुरुवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली. यावेळी 7.30 ते 9.30 या दोन तासात 15.37 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. कोठेही मतदान यंत्रे बंद पडले नाही. मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यानंतर सकाळी 11.30 पर्यंत 35.23 टक्के इतके मतदान झाले. 2,506 पुरुष व 2,159 महिला मतदार यांनी हक्क बजावला. 7.30 ते 3.30 पर्यंत 63.89 टक्के इतके मतदान झाले. या टप्प्यात एकूण 4, 318 पुरुष व 4, 140 महिला मतदारांनी मतदान केले. एकूण 8, 458 मतदारांनी बजावला. अखेरच्या टप्प्यात सरासरी 73 टक्के इतके मतदान झाले. 63 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून या सर्वांचा फैसला शुक्रवारी सकाळी होणार आहे. 

अर्ध्या तासात निकाल 

मतमोजणी सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजता सुरू होईल. 18 टेबल लावण्यात येणार असून दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार असून सुमारे अर्ध्या तासात निकाल स्पष्ट आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT