children drown sakal
कोकण

Children Drown : मुलीला वाचवताना दोन किशोरवयीन मुले नदीत बुडाली

नदीवर गेलेल्या किशोरवयीन मुलांना नदीपात्रात उडी घेण्याचा मोह आवरला नाही. एका मुलीने नदीपात्रात उडी घेतली. मात्र, तिचा अंदाज चुकला.

सकाळ वृत्तसेवा

नदीवर गेलेल्या किशोरवयीन मुलांना नदीपात्रात उडी घेण्याचा मोह आवरला नाही. एका मुलीने नदीपात्रात उडी घेतली. मात्र, तिचा अंदाज चुकला.

लांजा - दुपारच्या वेळी नदीवर गेलेल्या किशोरवयीन मुलांना नदीपात्रात उडी घेण्याचा मोह आवरला नाही. एका मुलीने नदीपात्रात उडी घेतली. मात्र, तिचा अंदाज चुकला. ती गटांगळ्या खाऊ लागताच जोरजोरात तिच्या आईला हाका मारू लागली. हे पाहून त्यांच्यापैकी एका मुलाने तिला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, दोघेही बुडाली. आज (ता. ११) दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना भांबेड येथील मुचकुंदी नदीपात्रात घडली. मयुरी घोसाळकर आणि सुशील तांबळे अशी बुडालेल्या दोन मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे घोसाळकर आणि तांबळे कुटुंबावर आघात झाला आहे.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील गोविळ-बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या विरार ईस्ट येथे राहणाऱ्या संगीता तुकाराम पवार या आपल्या मुली मयुरी कमलेश घोसाळकर (वय १५), तसेच प्रतीक्षा कमलेश घोसाळकर (१२) यांच्यासह गावी आल्या होत्या. त्यांच्यासोबत सुशील गुंडाप्पा तांबळे (१४) आणि तन्मय गुंडाप्पा तांबळे (१०, दोघे रा. वरळी नाका, मुंबई) हे देखील आले होते.

संगीता पवार यांची आई वनिता तुकाराम पवार (६६) यांचा १० एप्रिलला वाढदिवस असल्याने त्या ९ एप्रिलला मोटारीने मुंबईहून गावी गोविळ-बौद्धवाडी येथे आले होते. आज (ता. ११) दुपारी जेवण आटोपून हे सर्वजण मुचकुंदी नदीवर भांबेड येथे आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत वनिता पवार तसेच मोटारचालक रुपेश कोंडीभाऊ कंदारे असे एकूण सातजण नदीवर गेले होते. कपडे धुण्यास सुरुवात केली असताना नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी प्रथम मयुरी घोसाळकर हिने उडी मारली. मात्र, नदी पात्राचा व नदीतील मोठ्या कोंडीचा (कातळकडा) अंदाज न आल्याने ती गटांगळ्या खाऊ लागली. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत मयुरी हिने आईला हाका मारल्या. तिचा ओरडा ऐकून सुशील तांबळे याने नदीत उडी मारली. ही दोघेही बुडाली. या दोघांचे मृतदेह लांजा ग्रामीण रुग्णालयात आणले असून पुढील प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT