Large scale smuggling of Gutkha from Karnataka to Maharashtra 
कोकण

कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात: अनेक कंपन्या बनावट 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : महाराष्ट्रात गुटखाबंदी होऊन आठ वर्षे झाली; मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे. कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे कोकणात येत आहे. छोट्या-मोठ्या वाहनांबरोबर कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असून त्याला काहींचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. 


चिपळुणातील नागरिकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने २६ लाखाच्या गुटख्याची तस्करी उघड केली. या प्रकरणी चिपळुणातील मुश्‍ताक कच्छी आणि सिंधुदुर्गातील दोन वाहनचालकांना अटक केली होती. कच्छी हा सिंधुदुर्गातील भूषण शिरसाट या व्यक्तीकडून गुटखा विकत घ्यायचा, हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. शिरसाट हा कर्नाटकमधून गुटखा विकत आणायचा, असे त्याने पोलिसांना सांगितले. 


२०१२ मध्ये गुटखाबंदी केली पण प्रभावी अंमलबजावणीअभावी राजरोस खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. बंदीमुळे अधिकृत गुटख्याच्या ब्रॅंडनी राज्यातील कारखाने बंद केले तर काहींनी गुजरात व कर्नाटकात कारखाने हलवले. चिपळूणसह जिल्ह्यात काही ठिकाणी अनधिकृत कारखाने सुरू झालेत. त्याशिवाय कर्नाटकातील गुटखा गोवामार्गे रत्नागिरी व सिंधुदुर्गात आणला जात आहे. गुटखा तयार करणारे कारखानदार, वितरक, विक्रेते यांनी समांतर यंत्रणा उभी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून छोट्या, मोठ्या वाहनांतून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. २६ लाखाचा गुटखा चिपळूणपर्यंत आला. त्याची माहिती संबंधित खात्याला मिळाली नाही.

एक नजर
 गुटख्याच्या अनेक कंपन्या बनावट 
 ५० पैसे किमतीच्या गुटख्याची सात रुपयांनी विक्री
 ब्रॅंडेड कंपन्यांच्या गुटख्याची किंमत १५ ते २५ रुपये 
 कर्नाटकातून गोवामार्गे आलेला गुटखा कोकणात वितरित 
 रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुटख्याचे गोडाऊन
 काही व्यापाऱ्यांनीही उभी केली विक्रीची समांतर यंत्रणा

गुटखाबंदीच्या अंमलबजावणीस अन्न व औषध प्रशासनाबरोबर पोलिसांना अधिकार दिले होते; तसेच शाळा, कॉलेजच्या आवारात होणाऱ्या गुटखा विक्रीवर कारवाईचे अधिकार मुख्याध्यापक व प्राचार्यांना दिले आहेत; पण गुटखा विक्रीवर कारवाईचे धाडस दाखवलेले नाही.
- शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

संपादन- अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

New Marathi Books : मराठी वाङ्‍मयाचा वारसा आणि वर्तमान ; दुर्मीळ ग्रंथ, ध्यानमार्गदर्शन व स्त्रीमनाच्या कवितांचा नवा पुस्तकमेळा

Marathi News Live Updates : संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा दिल्ली पोलीसांकडून सखोल तपास सुरू

AUS vs BAN: बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! मिचेल स्टार्कचा कहर, अवघ्या २ दिवसांत कसोटी जिंकत १-१ ने बरोबरीत

SCROLL FOR NEXT