last auction of daud ibrahim property rupees 1 crore 10 lakh all property done in ratnagiri
last auction of daud ibrahim property rupees 1 crore 10 lakh all property done in ratnagiri 
कोकण

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे कोकणातील मिटले नामोनिशान

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचे लोटे येथील नामोनिशाण मंगळवारी झालेल्या लिलावात मिटले गेले. दाऊदची मालमत्ता अर्थात पेट्रोल पंपाच्या जागेचा लिलाव पार पडला. खेडमधील तरुण उद्योजक रवींद्र काते यांनी 1 कोटी 10 लाखाला बोली लावून दाऊदची ही मालमत्ता मिळवली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या लिलावांचं सत्र सुरु आहे. दाऊदच्या खेड तालुक्यातील लोटे येथील संपत्तीचा लिलाव पार पडला. 

रवींद्र काते यांनी ती खरेदी केली. आणखी एकाने लिलावात भाग घेतला. अवघ्या अर्ध्या तासात लिलाव प्रक्रिया पार पडली. अद्याप मुंबके येथील दाऊदच्या पाच मालमत्तांचा लिलाव होणे बाकी आहे. लिलावा दरम्यान रवींद्र काते यांनी या संपत्तीसाठी लावलेली एक कोटी 10 लाख रुपयांची बोली सर्वात मोठी ठरली. दाऊदच्या या संपत्तीची बेस प्राइज एक कोटी 9 लाख 15 हजार 500 रुपये ठेवण्यात आली होती. दाऊदच्या संपत्तीसाठी ऑनलाईन लिलाव करण्यात आला. त्याचे आयोजन स्मग्लर अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अ‍ॅक्ट (एसएएफईएमए) प्राधिकरणाने केलं होतं. 

मंगळवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लिलाव प्रक्रिया सुरू झाली. त्यात दोघांनी भाग घेतला. लोटे येथील सर्वे नं. 81, हिस्सा नं. 13/1, 14/ब येथील 30 गुंठे जागा, पेट्रोलपंपाच्या बांधकामासह लिलावात विकली गेली. लिलाव झालेल्या संपत्तीमध्ये 30 गुंठे जमिनीचा समावेश होता. नोव्हेंबरमध्ये इतर संपत्तींसोबत लिलाव होणार होता. त्यावेळी एसएएफईएमए प्राधिकरणाला एका तांत्रिक अडचणीची माहिती मिळाल्याने लिलाव थांबवण्यात आला होता. याआधी काही वर्षांपूर्वी दाऊदच्या जप्त केलेल्या मुंबईतील संपत्तीचा लिलावही नुकताच करण्यात आला. डांबरवाला बिल्डिंग, हॉटेल रौनक अफरोज, शबनम गेस्ट हाऊस या मुंबईतील संपत्तीसह दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी 32 हजार रुपयांत खरेदी केली होती.

लोटेतील दाऊदचा भूखंड खरेदी करायचा अशी ईर्षा होती. त्यासाठी अनामत रक्कम, कागदपत्रे अशी सर्व तयारी केली. लिलाव तर जिंकलाच, उर्वरित रक्कम तीन महिन्यांत भरायची आहे. लिलावात घेतलेल्या दाऊदच्या जागेवर नेमके काय करायचे, हे अद्याप ठरवलेले नाही, अशी माहिती बोली जिंकणारे रवींद्र काते यांनी पत्रकारांना दिली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT