Learn From Home How Possible In Rajapur Taluka Ratnagiri Marathi News  
कोकण

कसे होणार `इथे` लर्न फ्रॉम होम ?

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - कोरोनामुळे शाळा सुरू होण्याबाबत अनिश्‍चिततेची टांगती तलवार आहे. त्यामध्ये शिक्षण विभागाने "लर्न फ्रॉम होम'ला प्राधान्य देत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. मात्र, अनेक गावांमध्ये मोबाईल रेंजचा अभाव, कोलमडलेली इंटरनेट सेवा तर काही पालकांकडे स्मार्ट फोन नाही अशा स्थितीत अनेक मुलांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्‍यातील सुमारे 1 हजार 946 मुले घरात बसून स्मार्ट फोनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. 

ज्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहे ती मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत तर काही पालकांनी मोबाईलवर दिशा ऍप डाऊनलोड केले असून त्याच्या माध्यमातून "लर्न फ्रॉम होम' संकल्पनेतून शिकत असल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली. लॉकडाऊनच्या काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने "लर्न फ्रॉम होम'ला प्राधान्य दिले आहे. त्याची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने अंमलबजावणी सुरू आहे.

तालुक्‍यामध्ये सुमारे 341 शाळांमधून सुमारे दहा हजाराहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मोबाईल रेंजसह इंटरनेट सेवेचा बोजवारा उडालेला आहे. अनेक सर्वसामान्य पालकांकडे स्मार्ट फोनही नाही. त्यामुळे "लर्न फ्रॉम होम' संकल्पनेचा ग्रामीण भागामध्ये बोजवारा उडालेला आहे. तालुक्‍यातील 1 हजार 946 विद्यार्थी लॉकडाऊनच्या काळात "लर्न फ्रॉम होम' संकल्पनेतून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT