led bulb found malvan beach konkan sindhudurg 
कोकण

समुद्र किनारी सापडताहेत भलेमोठे एलईडी बल्ब, नेमका काय आहे हा प्रकार? वाचा...

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) - पर्सनेटच्या मासेमारीस बेकायदेशीररित्या वापरला जाणारा आणखी एक एलईडी बल्ब काल (ता. 21) कोळंब सोमती समुद्रकिनारी आढळून आला. सहा दिवसांत तिसऱ्यावेळेस एलईडी बल्ब सापडला आहे. या बल्बचा पंचनामा करण्यास पोलिसांनी नकार देत हे काम मत्स्यव्यवसाय विभागाचे असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, मत्स्य व्यवसाय विभागाने समुद्र किनारी सापडणारे एलईडी बल्ब हा समुद्र कचरा आहे, यामुळे त्यांचा पंचनामा करणे आवश्‍यक नसल्याचे सांगितले. यामुळे आता संशयास्पदरित्या सापडणाऱ्या एलईडी बल्बची जबाबदारी कोणाची असा प्रश्‍न मच्छीमारांना पडला आहे. 

पाच दिवसांतील वादळी हवामानामुळे विविध प्रकारचा समुद्री कचरा किनाऱ्यावर वाहून येत आहे. यात सिलिंडर, एलईडी मासेमारीसाठी वापरले जाणारे बल्ब यांचा समावेश आहे. स्थानिक मच्छीमारांनी दक्ष नागरिक म्हणून याची माहिती पोलिसांना दिली. दांडी येथे सापडलेले दोन एलईडी बल्ब पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत ताब्यात घेतले होते. परंतु कोळंब समुद्रकिनारी आढळून आलेला एलईडी बल्ब ताब्यात घेण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवित हे काम मत्स्यव्यवसाय विभागाचे असल्याचे स्पष्ट केले. 

मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिस ठाण्यातून एलईडी बल्बची माहिती देण्यात आली आहे; मात्र तो समुद्री कचरा असल्याने आम्ही तो गोळा करत बसायचा का? असा प्रश्‍न केला. एलईडी मासेमारी होत आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सापडणारे एलईडी बल्ब गोळा करण्याची आवश्‍यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

बल्ब सापडण्याचे प्रमाण वाढले 
कोळंब समुद्र किनारी सापडलेल्या एलईडी बल्बबाबत महेंद्र पराडकर यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार सहायक मत्स्यविकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांच्याशी संपर्क साधला. किनारपट्टीवर एलईडी बल्ब सापडण्याचे प्रमाण वाढत आहे; मात्र पोलिस, मत्स्य व्यवसाय विभागाकडून हे बल्ब ताब्यात घेण्याची कार्यवाही होत नसल्याने मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT