Leopard attack again in Rajapur
Leopard attack again in Rajapur 
कोकण

राजापुरात बिबट्याचा पुन्हा हल्ला ; परिसरात भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

राजापूर - काही दिवसांपूर्वी तालुक्यातील करक येथे बिबट्याने गोठ्यात घुसून दहा शेळ्या मारल्याची घटना ताजी असतानाच काल (ता.20) मध्यरात्री ताम्हाने येथे बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही वासरे गंभीररीत्या जखमी असून ती अत्यावस्थ  स्थितीमध्ये असल्याची माहिती राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी यांनी दिली. 
मानवी वस्तीतील बिनधास्त वावरासह बिबट्याकडून वारंवार होणार्‍या या हल्ल्यामुळे लोकांसह शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

दरम्यान, वनविभागाच्या अधिकारी, कर्मतार्‍यांनी ताम्हाणे गावाला भेट देवून घटनेचा रितसर पंचनामा केला आहे. तर, पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमी वासरांवर उपचार सुरू केले आहेत. 
गेल्या काही महिन्यांपासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये काही ठिकाणी बिबट्याने पाळीवर जनावरांवरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या पूर्व भागातील करक येथे एका शेतकर्‍याच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने दहा शेळ्या मारल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना काल (ता.20) रात्री 1.30 वा. च्या सुमारास ताम्हाने पहिलीवाडी येथील अशोक अनंत चव्हाण यांच्या गोठ्यात घुसून त्या ठिकाणी बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये दोन वासरे जखमी झाली असून ती अत्यावस्थ असल्याची माहिती वनरक्षक श्री. गोसावी यांनी दिली. 

जंगल परिसरासह लोकवस्तीमध्ये बिबट्याच्या असलेल्या बिनधास्त वावरामुळे लोकांसह शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच गोठ्यामध्ये घुसून पाळीव जनावरांवर बिबट्याकडून होणार्‍या या हल्ल्यामुळे अधिकच घबराट पसरली आहे. दहशत निर्माण करणार्‍या या बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांसह शेतकर्‍यांकडून केली जात आहे.  


 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT