Leopard attacks goats chinder padekap konkan sindhudurg 
कोकण

भरवस्तीत बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

महेश बापर्डेकर

आचरा (सिंधुदुर्ग) - चिंदर पडेकाप येथे बिबट्याने भरवस्तीत घुसून मांगरातील शेळीचा फडशा पाडल्याची घटना मध्यरात्री घडली. हा प्रकार आज पहाटे चरण्यासाठी शेळ्या सोडण्यासाठी गेलेल्या संतोष जंगले यांच्या निदर्शनास आला. 

भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या माळरानावर असलेल्या जंगले कुटुंबीयांच्या वस्तीत घुसला होता. संतोष जंगले यांच्या बकरीचा बिबट्याने फडशा पडल्याने सुमारे 14 हजाराचे नुकसान झाले आहे. बिबट्या राहत्या वस्तीत घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती जंगले यांनी वनविभागाला दिली. या अगोदरही रानात चरायला सोडलेल्या जंगले कुटुंबीयांच्या सहा शेळ्या 22 नोव्हेंबरला बिबट्याने मारल्या होत्या. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत पसरली असून तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT