leopard death ansur konkan sindhudurg 
कोकण

फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू 

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - अणसुर (ता. वेंगुर्ले) येथे अज्ञाताने मंगळवारी (ता.29) सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकला होता. वनविभागाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने त्या जखमी बिबट्याला पिंजऱ्यात पकडले होते; परंतु त्या बिबट्याला दुखापत झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. 
वेंगुर्ले अणसुर घाटी माथ्यावरील संजय गावडे यांच्या बागेत बिबट्या फासकीत अडकला होता. मंगळवारी (ता.29) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास श्री. गावडे बागेत गेले असता बिबट्याने डरकाळी फोडली; मात्र बिबट्या फासकीत अडकल्याने गावडे वाचले होते.

तत्काळ त्यांनी पोलिसपाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात याबाबत माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल चिरमे, नेरूर वनपाल कोळेकर, मठ वनरक्षक व्ही. एस. नरळे, तुळस वनरक्षक सावळा कांबळे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अडकलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पिंजऱ्यात पकडले. यावेळी गावडे यांच्यासह पोलिसपाटील तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, राजेश गावडे, परशुराम तलवार, अनिल नवार, सुनील गावडे, राकेश गावडे आदी सहभागी झाले. 

उपचारावेळी मृत्यू 
अणसुर येथील बिबट्या (मादी) 2 वर्षाची होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वनविभागाने पकडून आकेरी येथील वन विश्रामगृहावर नेले. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी अमृत शिंदे हे उपचार करीत होते. सकाळपर्यंत बिबट्याची प्रकृती ठीक होईल, असे वाटत होते; मात्र आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मृणाल रेवटी यांनी विच्छेदन केले. त्यानंतर आकेरी येथे वनविभागाने अंत्यसंस्कार केले, अशी माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission Update: आठवा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना लवकरच ‘Good News’ कारण...

IND vs NZ 2nd T20I : भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २००+ धावांचा 'असा' पाठलाग करणारा जगातील पहिलाच संघ

Pune Election : रूपाली ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे पोलिसांची कठोर कारवाई: वानवडीतील गुन्हेगार महेश शिंदेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Investment Fraud : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT