leopard fall in 20 meter well but village people save in sindhudurg 
कोकण

लाईट चालू करताच बिबट्याने धूम ठोकली मात्र ग्रामस्थांच्या मदतीने वाचला त्याचा जीव

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग)  : तालुक्‍यातील मसुरे-भोगलेवाडी येथे भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. मसुरे-भोगलेवाडी येथील सुरेश रावराणे यांच्या कुत्र्याच्या मागावर हा बिबट्या वस्तीत आला होता. 

कुत्र्यांच्या जोरदार भुंकण्यामुळे राणे यांना पहाटे तीनच्या सुमारास जाग आली. घराबाहेरील लाईट चालू करताच या बिबट्याने धूम ठोकली होती. काही वेळातच पुन्हा कुत्र्यांचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी कानोसा घेतला असता लगतच्या गजानन भोगले यांच्या सुमारे वीस फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी पोलिस पाटील गोविंद सावंत यांना संपर्क साधत वनविभागाला कळविले. 

विहिरीत असलेल्या पंपाच्या पाईपला पकडून बिबट्या कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. आज सकाळी 7.30 च्या सुमारास मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक सारीक फकीर, गुरुनाथ आचरेकर, चेतन मयेकर यांनी विहीरीत पिंजरा सोडत बिबट्याला बाहेर काढले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वेर्लेकर यांनी आरोग्य तपासणी केली. वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... 'लालबागचा राजा'च्या चरणी भरभरुन दान, ३ दिवसांत कोट्यवधींची देणगी; आकडा पाहून व्हाल थक्क!

Nandigram Bypoll : पश्चिम बंगालमधील नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची अचानक माघार, नेमकं काय घडलं?

LP Gas Tanker Accident: वाडाखडकोना येथे एलपी गॅस टँकर कलंडला; गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

SCROLL FOR NEXT