Leopard Fall In Well Ratnagiri Marathi News 
कोकण

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला अन्...

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत बिबट्या पडल्याची घडना तालुक्‍यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथे बुधवारी (ता. 18) घडली. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील बिबट्याला सुखरूप बाहेर काढून त्याला नैसगिक अधिवासामध्ये सोडले. हा बिबट्या मादी सुमारे एक वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथील संतोष शंकर दर्पे आज सकाळी शेतमळ्यातील विहिरीवर बसविलेला पाण्याचा पंप सुरू केला. मात्र त्यावेळी पंपाला पाणी येत नव्हते. त्यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता त्यांना विहिरीत बिबट्या असल्याचे दिसले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना देताना वनविभागालाही माहिती दिली.

ही माहिती लोकांच्या कर्णोपकर्णी होताच लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीकडे धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर काही वेळानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने चिपळून वनअधिकारी रमाकांत भवर, वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, राजापूरचे वनपाल एस. व्ही. घाटगे, वनपाल संजय रणधीर, कर्मचारी दीपक म्हादये, विजय म्हादये, दीपक चव्हाण आदींनी बिबट्याला पिंजरा सोडून विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. पिंजऱ्यामध्ये पडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले. 

दोन महिन्यातील पाचवी घटना 

शेजवली-कोंड्ये भागामध्ये बिबट्या किंवा त्याची पिल्ले आढळण्याची वा वनविभागाकडून त्यांना जेरबंद करण्याच्या गेल्या दोन महिन्यांमध्ये सातत्याने घटना घडत आहे. विहिरीमध्ये बिबट्या पडून त्याला जेरबंद करण्याची या परिसरातील गेल्या दोन महिन्यातील पाचवी घटना घडली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT