leopard rescued vengurla taluka konkan sindhudurg 
कोकण

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - म्हापण येथील सुरेश चव्हाण यांच्या राहत्या घरालगत असणाऱ्या विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने जीवदान दिले. पिंजऱ्याच्या साहाय्याने 35 ते 40 फूट खोल विहिरीतून बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

म्हापण येथे एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती स्थानिकांकडून वनविभागाला मिळाली. तत्काळ वनविभाग बचाव पथक घटनास्थळी निघाले. तो पर्यंत विहिरीमध्ये दोरखंडाच्या साहाय्याने लाकडी फळी स्थानिकांनी सोडली. त्याच्या आधाराने बिबट्या फळीवर बसुन राहिला. हा बिबट्या नर असून अंदाजे 2 ते 2.5 वर्षांचा होता. पथकाने ग्रामस्थांच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले.

त्यानंतर कुडाळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. डी. नारनवर, सहाय्यक वनसंरक्षक आय. डी. जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल अ. पां. शिंदे, वनपाल धु. रा. कोळेकर, अ. स. चव्हाण, ना. फ. चव्हाण, वनरक्षक नरळे, श्री. मेहत्तर, श्री. सावंत, पोलीस पाटील बापसेठ चव्हाण, वनमजुर मयेकर यांनी मदत केली. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT