Leopard
Leopard 
कोकण

रत्नागिरी : पावस - मावळंगेत पुन्हा बिबट्याची दहशत 

सकाळ वृत्तसेवा

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पावस ते मावळंगे रस्त्यावर नाखरे फाटा येथे रात्रीच्या वेळी पुन्हा बिबट्याने दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले होते. चारचाकी वाहनांतून जाणाऱ्या प्रवाशांनी रस्त्याजवळ दबा धरुन बसलेल्या बिबट्याचे व्हिडीओही केले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. 

शनिवारी (ता. 19) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नाखरे फाटा येथे चारचाकी वाहनाने जाणाऱ्या लोकांना बिबट्याचे दर्शन झाले. भयभीत झालेल्या त्या लोकांनी तत्काळ मावळंगे गाठले. धाडस करून त्या लोकांनी पुन्हा त्याच मार्गावर बिबट्या आहे का, त्याची पाहणी करण्यासाठी फेरफटका मारला. तेव्हा भक्ष्याच्या शोधात बिबट्या रस्त्याशेजारी दबा धरून असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे यांनी या परिसरातील वाहनचालकांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. 

पावस परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून यापूर्वी पावस, कुंभारघाटी, गणेशगुळे फाटा, कुर्धे, मेर्वी, जांभूळ आड, बेहेरे टप्पा आदी परिसरात बिबट्याने अनेक दुचाकीस्वारांवर हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश आले.

वनविभागाने पिंजरा आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी गस्ती पथकही या परिसरात दाखल झाले होते; परंतु कालांतराने वन विभागाचे प्रयत्न थांबले. या कालावधीत बिबट्या जंगलातून, वाडीवस्तीतून बिनधास्तपणे फिरत होता. आतापर्यंत सुमारे 17 जणांवर बिबट्याने हल्ला केला असून शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना नुकसानभरपाई वाटप करण्याचे काम प्रशासन करत आहे. बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर उपोषण करू, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ किरण तोडणकर यांनी वन विभागाला दिला होता; परंतु वन विभागाकडून त्याकडे दुर्लक्षच केले आहे. 

दिवसभर व्यवसायानिमित्त पावसला ये-जा सुरू असते. अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते. बिबट्याचा वावर सुरू झाल्यानंतर दुचाकीने जाणे धोकादायक वाटू लागले आहे. संपूर्ण परिसरात रस्त्याच्या दुतर्फा झाडे आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्याने वाहन चालवताना भीती वाटते. 
- अनिल बिर्जे,
व्यावसायिक, मावळंगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT