दोन संशयितांसोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी. Sakal
कोकण

बंदुकांसह बिबट्याचे कातडे जप्त

चिपळूण, खेडला गुन्हे शाखेची कारवाई; चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - तालुक्यातील गुढेफाटा ते पाथर्डी रस्त्यावर मोटारसायकलने जाणाऱ्या तरुणांकडून एक सिंगल बॅरल बंदूक व बिबट्याचे कातडे जप्त करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. याचवेळी खेड हद्दीतील मौजे मुरडे शिंदेवाडी येथील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून विनापरवाना असलेली बंदूक जप्त केली. या प्रकरणी केलेल्या चौकशीनंतर तळवटपाल उपाळेवाडी येथे छापा टाकून बंदूक निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. चिपळूण गुढेफाटा येथे रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईअंतर्गत सचिन रामचंद्र साखरकर (३६, रा. डुगवे, साखरकरवाडी), प्रदेश प्रकाश बुदर (४०, बुदरवाडी गुढे) यांना अटक केली. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे, सिंगल बॅरल काडतुसाची परवाना नसलेली बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी वन्यजीव सरंक्षणाच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेला चिपळूण तालुक्यातील गुढेफाटा येथे पाथर्डी रस्त्यावर दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचालीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन संशयास्पद तरुणांची मोटारसायकल थांबवली. त्यांच्या सॅकची तपासणी केली. त्यामध्ये बिबट्याचे कातडे, सिंगल बॅरल काडतुसची बंदूक व ४ जिवंत काडतुसे मिळाली. त्याप्रमाणे मोटारसायकलसह अन्य साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस फौजदार प्रशांत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनायक माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार नितीन डोमणे, अरुण चाळके, बाळू पालकर, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर व दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला. त्यांना वनविभागाचे दत्ताराम राजाराम सुर्वे यांनी मदत केली.

शिंदेवाडीतील घरावर छाप्यातील कारावाईत दोघांवरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत काशीद, पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, पोलिस हवालदार विक्रम बुरॉडकर, संकेत गुरव, रोहित जोयशी, किरण चव्हाण यांनी सहभाग घेतला.

शिंदेवाडीतील घरावर छापा, बंदूक जप्त

दुसऱ्या घटनेत खेडचे सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे मुरडे-शिंदेवाडी येथील सचिन संतोष गोठल (वय २३) याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत विनापरवाना असलेली बंदूक जप्त केली. अधिक चौकशीअंती ही बंदूक पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री (५३, रा. तळवटपाल, उपाळेवाडी खेड) यांच्याकडून खरेदी केल्याचे समजले. त्याप्रमाणे सुतार यांच्या घरावर छापा टाकला असता, तेथे एक बंदूक व बंदूक निर्मितीसाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त केले. त्यानुसार या दोघांवर पोलिस शिपाई संकेत गुरव यांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT