leopards attack bull found dead in pawas ratnagiri 
कोकण

बिबट्याची दहशत कायम: महिनाभराच्या विश्रांती नंतर केला बैलावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : बिबट्याच्या माणसांवर व प्राण्यांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या नागरिकांना एक महिना उसंत मिळाली होती. परंतु पावस कुंभारघाटी परिसरात एका बैलाला ठार करून बिबट्याने आपण अजून गेले नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भितीचे वातावरण बनले आहे.


रत्नागिरी तालुक्‍यातील पावस, नाखरे, गणेशगुळे. पूर्णगड, मावळंगे, कुर्धे, मेर्वी ही गावे गेली तीन महिने बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. या भागात बिबट्याने ग्रामस्थ आणि जनावरांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे या परिसरात फिरताना सर्वजण जीव मुठीत घेऊन फिरत आहेत. मावळंगे येथे पाड्यावर हल्ला केल्यानंतर बिबट्याने गेले महिनाभर विश्रांती घेतली होती. वनविभागानेही या भागातील गस्त कमी केली होती. त्याचाच फायदा घेत बिबट्याने एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पावस कुंभारघाटी परिसरातील विद्याधर शेट्ये यांच्या बैलावर हल्ला करून ठार मारले.

चरण्यासाठी सोडलेला बैल रात्री परत आला नाही. सकाळी चार वाजता एक रिक्षाचालक रत्नागिरीहून येत असताना त्या भागात वास येऊ लागल्याने गणेशगुळे फाट्याजवळील कोणीतरी मेल्याची लक्षात आले. परंतु काळाकुट्ट अंधार असल्याने त्याने थांबून पाहिले नाही. मात्र उजाडल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर जागामालकाला कळविण्यात आले. घटनास्थळी प्रवीण शिंदे, नाना गांगण, नाखरे माजी सरपंच विजय चव्हाण, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन वनविभागाला कळविण्यात आले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT