Life imprisonment In Torture Case In Ratnagiri News
Life imprisonment In Torture Case In Ratnagiri News 
कोकण

चाळीत राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - रत्नागिरी शहरानजीकच्या चाळीत राहणाऱ्या पीडित अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  मंजुनाथ लिंगप्पा भसमणी (रा. सैतनी-बेळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

ही घटना 11 जून 2018 संध्याकाळी सहाच्या सुमारास उपनगरात घडली होती. आरोपी हा शहरानजीकच्या उपनगरातील एका चाळीत राहात होता. सायंकाळी पीडित मुलगी व तिचा भाऊ अंगणात खेळत होती. आरोपीने चाळीतील या अल्पवयीन दोन भावंडांना खाऊचे अमिष दाखवून बोलावून घेते. खाऊच्या अमिषाने बळीपडून दोघेही भावंड चाळीतील खोलीत गेली. त्यातील सहा वर्षाच्या चिमुकलीवर आरोपीने लैगिंक अत्याचार केला. याबाबत पीडित चिमुकलीने घडलेली घटनेची माहिती आईला सांगितली. पीडित चिमुकलीच्या आईने तत्काळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवी कलम 376 व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 2012 (पॉस्को)3,4,7,8 अन्वये गुन्हा दाखल केला होता. 

तपास ग्रामीण पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक चित्रा मढवी करत होत्या. मढवी यांनी सखोल तपास करून आरोपीला अटक केली. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आज (ता. 11) या खटल्याचा निकाल विशेष न्यायालय एल. जी. बिले यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे ऍड. अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले. यावेळी आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपी मंजुनाथ भसमणी याला जन्मठेपेची शिक्षा व 25 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्याची कैद सुनावली आहे. पेहरवी अधिकारी म्हणून अनंत जाधव तर कोर्ट ड्यूटी महिला पोलिस नाईक संजीवनी मोरे यांनी सहकार्य केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT