कोकण

रत्नागिरीत उभारणार साहित्यिक गुढी

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मराठी साहित्यात चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, नवे साहित्यिक घडावेत या उद्देशाने जनसेवा ग्रंथालयातर्फे सलग दुसऱ्या वर्षी औत्सुक्‍याचा विषय ठरलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहाला जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे.

साहित्य विश्वातील हा आगळा-वेगळा असा उपक्रम आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी उभारण्यात येईल. या प्रसंगी गुढीची पूजा व ग्रंथपूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर मराठी साहित्याचा पाया रचणाऱ्या संत साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. साहित्यिक गुढीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि त्यांचे अभंग साहित्य या विषयावर निवृत्त शिक्षक सु. द. भडभडे मार्गदर्शन करतील.

गेल्या वर्षीसुद्धा अशा प्रकारे साहित्यिक गुढी जनसेवा ग्रंथालयाने उभी केली होती. शालिवाहनाच्या पराक्रमाच्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरू करण्यात आले. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिप्रदा. विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते शक अशा दोघांचाही अंतर्भाव शालिवाहन शकामध्ये झाला.

महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारली जाते. नव्याची सुरवात आणि नव्याची निर्मिती असा साधासोपा अर्थ या सणाचा आहे. त्या अनुषंगाने मराठी साहित्य विश्वात नव्याची निर्मिती व्हावी अर्थात वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध जनसेवा ग्रंथालयातर्फे साहित्यिक गुढी उभारली जाणार आहे.

शालिवाहनाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यात प्राण फुंकून शकांचा पराभव केला व मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजात चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली. त्याप्रमाणे साहित्यिक गुढीतून वाचक, लेखक तयार करण्याचा प्रयत्न जनसेवा ग्रंथालय करीत आहे.
- प्रकाश दळवी
, अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT