Local body elections in Ratnagiri election between rebel politician and loyal politician politics  sakal
कोकण

चिपळूण : आता लढाई बंडखोर विरुद्ध निष्ठावंताची

बंडखोर विरुद्ध निष्ठावंत हा सामना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रंगलेला पाहायला मिळणार

मुझफ्फर खान

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होणार आहेत. या निवडणुकांमध्ये बंडखोर आमदारांना कार्यकर्ते आणि मतदांरासमोर अग्नी परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे बंडखोर विरुद्ध निष्ठावंत हा सामना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रंगलेला पाहायला मिळणार आहे. कोकण हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आघाडी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात राष्ट्रवादीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु मतदारांची साथ नेहमीच शिवसेनेला राहिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणातून शिवसेना संपली असे भाकीत वर्तवले गेले होते. त्यावेळी शिवसेना काही काळासाठी मागे गेली परंतु संपली नाही. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीपक केसरकर रत्नागिरीचे उदय सामंत आणि दापोलीचे योगेश कदम या तीन आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली. नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते परंतु शिवसेनेची सत्ता येणार नाही त्यामुळे शिवसेनेत राहून मी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही असे गृहीत धरून राणे तेव्हा काँग्रेसमध्ये गेले. यावेळी भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हठवायचे होते त्याच बरोबर शिवसेनाही संपवायची आहे त्यासाठी भाजपने शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले त्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आमदार सहभागी झाले. दीपक केसरकर बंडखोरांचे प्रवक्ते झाले. उदय सामंत यांनी वेळ मारून नेण्यासाठी राष्ट्रवादीवर टीका केली. या तिघांनी आम्ही शिवसेनेतच आहोत असे सांगण्याचा प्रयत्न केला.

काही काळ कार्यकर्त्यांनाही तसेच वाटले. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि बंडखोरांचा जल्लोष सर्वांनी पाहिला. आता पुढे जाणाऱ्या दिवसाप्रमाणे शिवसेना आणि बंडखोर आमदारांमधील संघर्ष आणखी तीव्र होत आहे. बंडखोर आमदारांची कृती शिवसेना विरोधी आणि भाजपला पोषक असल्याचे दिसते. आमदारांच्या बंडखोरीनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आम्ही शिवसेनेसोबत असल्याची साक्ष दिली असताना आता खासदार विनायक राऊत मैदानात उतरले आहेत त्यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. जुने कार्यकर्तेही आता सक्रिय झाले आहेत. पैशाने सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवत नेहमी राजकारणात केंद्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करणारे आता बंडखोर झाले आहेत. त्यामुळे बंडखोर विरुद्ध निष्ठावंत अशी लढाई आता सुरू झाली आहे.

आमचा कार्यकर्ता वडापाव खाऊन प्रसंगी दिवसभर उपाशी राहून संघटनेसाठी काम करतो. कार्यकर्त्यांची संघटनेवर निष्ठा आहे. आमच्या कार्यकर्त्यांना हॉटेल, झाडी, हिरवळ याचे अप्रूप नाही. शिवसेना आणि निसर्गाने कोकणला खूप काही दिले असताना तुम्ही गुवाहाटीला शिवसेनेच्या विरोधात का गेलात याचा जाब कार्यकर्ता बंडखोर आमदारांना विचारल्याशिवाय राहणार नाही.

- विनायक राऊत खासदार

विधानसभा निवडणुकीसाठी अजून अडीच वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. या अडीच वर्षात बंडखोर आमदार राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. आम्ही शिवसेनेत होतो असे कालपर्यंत सांगणारे बंडखोर आमदार आम्ही शिवसेना विरोधी का गेलो हे त्यांना मतदारांना पटवून द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT