lock down name given to Well in ratnagiri 
कोकण

एकावं ते नवलच ; येथे खोदलीय चक्क 'लाॅकडाऊन' विहीर

राजेश शेळके

रत्नागिरी - तालुक्यातील वेळवंडमधील भायजेवाडीतील ग्रामस्थांनी केलेला पराक्रम कायमस्वरूपी स्मरणात राहणारा आणि आदर्श सामुहिक कामाचा ठरला आहे. वाडीसाठी थोडी थोडकी नव्हे; तर 40 फुट विहिर खोदली आहे. त्यामुळे वाडीची तहान भागविणार्‍या ‘लॉकडाऊन विहिरीची सध्या चर्चा आहे.


महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. दगडातून पाणी काढणे म्हणजे रक्ताचे पाणी करण्यासारखे आहे. तरुण मुलांना विहिर खोदण्याचा अनुभव नव्हता. काही तरुण मुंबईतून आलेले तर काही रंगकाम, बांधकाम करणारे होते. पण जुन्याजाणत्या लोकांच्या मार्गदर्शनखाली सतत तीन महिने मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी विहिर खोदली. सध्या या विहिरीला मुबलक पाणी आहे.
 

वेळवंड येथील भायजेवाडीतील ग्रामस्थांनी विहीर खोदून लॉकडाऊनच चिरंतन केला. शिवाय गावकऱ्यांनी या विहिरीचे नावच लॉकडाऊन असे ठेवले आहे. 10 घरांच्या  भावकीने वाडीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांत 40 फूट विहीर खोदली. लॉकडाऊनच्या दुःखद आठवणींनाही सुखद करत कायम स्मरणात राहिल असं काम या गावाने केले आहे. विहीर खोदून झाली, पाणी मुबलक लागले, मात्र आता हे पाणी घरापर्यंत पोचवण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

विहीर खोदण्याच्या कामात पुरुषांबरोबर महिलांचाही मोलाचा वाटा आहे. नारायण भायजे, गणपत भायजे यांच्यासारख्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शन व सहकार्य यामुळे लॉकडाऊनचा खरा उपयोग करता आला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर परशुराम कदम व साक्षी रावणंग, संतोष गुरव, मनीष मोहिते यांच्या उपस्थितीत विहिरीचे पूजन करून विहिरीला ’लॉकडाऊन विहीर’ असे नाव देण्यात आले, अशी माहिती तुकाराम भायजे यांनी दिली.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Directors Mumbai Visit : गोकुळमधील महायुतीच्या संचालक पुन्हा सहलीवर; कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना; नेत्यांच्या भेटीनंतर अलिबागमध्ये राहणार?

Who Is Suraj Gurav? : साताऱ्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी सूरज गुरव; डॉ. वैशाली कडूकर यांची पुण्यात बदली, महापौर निवडीवेळी मुश्रीफांसोबत झालेला गुरव यांचा वाद

Raj Thackeray : मनसेचा दीपोत्सव रद्द! यंदा शिवाजी पार्कवर कार्यक्रम नाही, राज ठाकरेंची मोठी घोषणा, नागरिकांनाही आवाहन, काय म्हणाले?

IPS अनुराग कोण? SP पदावरून हटवलं, बदलीनंतर ४ दिवसात राजीनामा; M.Tech नंतर UPSCत मिळवलेलं यश

Latest Marathi News Live Update : ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी ४ वाजता मंत्रालयात महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT