Lockdown hits Ratnagiri's ambitious water plan 
कोकण

रत्नागिरीच्या महत्वाकांक्षी पाणी योजनेला लॉक डाऊनचा फटका... 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - सुधारित नळपाणी योजनेच्या कामाने गती पकडली असतानाच लॉक डाऊनमुळे नळपाणी योजनेचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. मे महिन्यापर्यंत निम्म्या रत्नागिरीला पाणी देण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी केला होता. मात्र यावर लॉक डाऊन मुळे पाणी फेरले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी पावसाळ्यात वारंवार फुटते. त्यामुळे धरणात पाणी मुबलक असतानाही शहराचा पाणी पुरवठा खंडित होतो. यावर उपाय म्हणून नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी नवीन ६९ कोटी रू. खर्चाच्या पाणी योजनेतील धरणाच्या ठिकाणी असलेल्या नदीकडून टाकली जाणारी नवीन जलवाहिनी विमानतळाजवळ जुन्या जलवाहिनीला जोडण्याची तयारी केली होती. जेणेकरून जलवाहिनी फुटून वारंवार खंडित होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील समस्या तात्पुरत्या स्वरूपात सुटू शकेल. मात्र, लॉकडाऊनमुळे हे काम बंद पडले आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे येथे होणारी विरोधाची समस्यासुद्धा नगराध्यक्षांनी मध्यस्थी करून मार्गी लावली. नव्या पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीचे काम वेगाने सुरूही झाले. परंतु, अवघ्या आठवडाभराचे काम शिल्लक असतानाच कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे काम रखडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT