lockdown impact student online exam form sindudurg 
कोकण

चिंता वाढली : सिंधुदुर्गातील त्या 20 मुलांचे वैद्यकीय परीक्षेचे भवितव्य अधांतरीच.....

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : गोव्यात आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणार्या महाराष्ट्रातील 20 विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनमध्ये गोव्या बाहेर असल्याने परीक्षा अर्ज भरणे कठीण झाले आहे. त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यातील बहुतांश विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गोवा राज्यात शिरोडा येथे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आहे. तेथिल २० विद्यार्थी संचारबंदी लागू होण्यापूर्वी पालकांना भेटण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. परंतू त्याचवेळी संचारबंदी जाहिर झाली. त्यामुळे जिल्हा व राज्याच्या सिमा बंद करण्यात आल्या. बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांना संचारबंदी काळात गोवा येथे परतणे अशक्य झाल्याने तेथेच अडकून पडले.या विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे अर्ज भरण्याची मुदत संचारबंदीकाळातील होती. ऑनलाईन परिक्षा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांला परिक्षा अर्ज अद्याप भरता आलेले नाहीत. गोवा विद्यापिठाने या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन परिक्षा १ जूनपासून जाहीर केल्या आहेत.

एकीकडे संपूर्ण देशात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना गोव्यात  परतण्यासाठी शासनाची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे; मात्र गोवा राज्यात प्रवेश केल्यास तपासणी कालावधी तसेच संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागल्यास त्याचे गोवा सरकारने जाहीर केलेले दरदिवशी प्रती व्यक्ती २५०० रुपयांचे शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे संचारबंदी काळात बाहेरगावी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांकरीता गोवा विद्यापिठ व सरकार काय तोडगा काढणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात वैद्यकीय सेवा देणा-या या विद्याथ्यांच्या भविष्याबाबतवेळीच उचित मार्ग काढणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT