Lockdown20
Lockdown20 Media Gallery
कोकण

रत्नागिरीत कडक लॉकडाऊन पुढे ढकलला; प्रशासनाचा निर्णय

राजेश कळंबटे

रत्नागिरी : 2 जुनपासून सुरु होणारे कडक लॉकडाउन एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय (ratnagiri lockdown from 3 june) आज जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. कडक निर्बंधांची अंमलबजावणी 3 ते 9 जून या कालावधीत होणार आहे. (ratnagiri lockdown 3 to 9 june) पुढील सात दिवसांसाठी आवश्यक खरेदी करण्यासाठी 48 तासांची मुभा दिल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ऑनलाईन (collector laxminarayan mishra) पत्रकार परिषदेत सांगितले.

बंदी काळात किराणा, भाजीपाला विक्री, चिकन, मटण शॉप्स, मच्छी मार्केट, आदींसह सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. (only emergenccy services open) जिल्ह्यातील 30 ते 40 टक्के उद्योग व्यवसाय बंद राहतील. पावसाळ्यात शेतक-यांना पैशाची गरज असते. त्यामुळे बँका, वित्तीय संस्थांमध्ये केवळ कृषी विषयक सेवाच सुरु राहतील. उर्वरित सर्व सेवा बंद राहतील.

3 जून ते 9 जून या कालावधीत सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार पूर्णत: बंद राहतील. (hotels closed) पार्सल सेवाही बंद राहिल. मेडिकल दुकानांमध्ये औषधांव्यतिरीक्त ग्रॉसरी किंवा अन्य साहित्य विक्रीला बंदी राहणार नाही. तसे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई केली जाईल. पेट्रोल पंपांवर अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल, डिझेल मिळेल. पेट्रोल पंप सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु राहतील. कृषी विषयक दुकाने, खते, कीटकनाशके विक्री दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेतच सुरु राहतील. अवजारांची दुकाने बंद राहतील.

जिल्ह्यातील सर्व खाजगी, शासकीय प्रवासी वाहतूक बंद राहिल. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना वाहतुकीची परवानगी दिली जाईल. सर्व आस्थापना बंद राहतील. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. चिपळूण, खेड, रत्नागिरी रेल्वे स्थानकांवर कोरोना टेस्टिंग सुरु राहिल. मान्सून पूर्व सुरु असलेली सर्व शासकीय कामे सुरु राहतील. जसे की रस्त्यांचे डांबरीकरण. ज्या गावांमड्ये लग्न असतील. त्याठिकाणी 1 पोलिस कॉन्स्टेबल, 1 व्हीडीओ ग्राफर, तलाठी आदी असतील. तसेच लग्न समारंभातील लोकांची कोव्हिड टेस्ट केली जाईल. अशी माहीती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिले आहेत.

रेड झोनमधून म्हणजेच सांगली, सातारा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणार्‍यांवर कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आंबा घाट, कुंभार्ली घाट व कशेळी घाटात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. परजिल्ह्यातून येणार्‍यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणे अत्यावश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT