रत्नागिरी - कोरोना जनजागृतीसाठी चक्क SP सायकलवरून रस्त्यावर

शहरातून सायकल, दुचाकी फेरी; नियमांचे पालन करण्याचे आवाहन
रत्नागिरी - कोरोना जनजागृतीसाठी चक्क SP सायकलवरून रस्त्यावर

रत्नागिरी : शहरात आज दुपारी अचानक पोलिसांचा (ratnagiri police on road) ताफा रस्त्यावर उतरला. ताफ्याचे नेतृत्व पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग हे चक्क सायकलवरुन करत होते. त्यांच्या पाठोपाठ दुचाकी, इतर वाहने होती. पोलिसांचे हे शक्तीप्रदर्शन असले तरी जनजागृती, संचारबंदीचा गैरफायदा (fear who breack the rules of lockdown) घेणार्‍या आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना कायद्याचा धाक राहावा यासाठीचे हे संचलन होते. कडक संचारबंदीच्यादृष्टीने पोलिसांची ही पावले आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. (covid-19 patients) मृतांची संख्याही वाढत आहे. परिणामी जिल्हा रेड झोनमध्ये (ratnagiri red zone district) गेला आहे. संचारबंदी लागू असूनही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत. शहरांतील गर्दी आणि वाहनांची वर्दळ कामय आहे. गर्दी संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. त्याला रोखण्यासाठी यंत्रणेला अपेक्षित यश आले नाही.

रत्नागिरी - कोरोना जनजागृतीसाठी चक्क SP सायकलवरून रस्त्यावर
कोकणात आंबेवाल्यांच्या लेकी-सुना असे करतात कष्ट

जिल्ह्यात 2 जूनपासून कडक निर्बंध (lockdown start from today) लागू होणार आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी आज शहरामध्ये संचलन केले. विशेष म्हणजे सायकलवरून हे संचलन झाले. त्यांच्या जोडीला पोलिस दलातील इतर वाहने होती. शहरातील प्रमुख भागातून हे संचलन झाले. पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अपेक्षित असलेले नियमांचे पालन करा, असे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com