in lockdown period auto driver star a new business in village to village in ratnagiri 
कोकण

'ना नफा, ना तोटा' या तत्वावर रिक्षावाल्या मामांनी केली सुरुवात अन्..

सकाळ वृत्तसेवा

लांजा : कोरोनाने अनेक जणांना आपल्या व्यवसायातसुद्धा बदल करावा लागला. पोट भरण्यासाठी मूळ व्यवसायाला फाटा देत, बदलत्या मागणीनुसार व्यवसायात उतरलेल्या अनेकजणांच्या कहाण्या पुढे येत आहेत. रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यापैकीच एक.

लॉकडाउन कालावधीत सर्व दळणवळणाची साधने ठप्प झाली. सर्वसामान्य माणसाला शहरात जाऊन भाजीपाला आणणे अशक्‍य झाले असतानाच रिक्षा व्यवसायदेखील सुरू नसल्याने संसाराची गाडी पुढे हाकायची कशी? या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी लॉकडाउन काळात गावातील वाड्यांमध्ये जाऊन भाजीविक्रीचा व्यवसाय आतापर्यंत सुरू ठेवला आणि रोजगाराची वेगळी वाट चोखाळली.

कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम गुरव यांनी नवीन मार्ग शोधला. शेतीच्या कामासाठी त्यांनी शासकीय पास काढला व भाजीचा व्यवसाय करायचा, असा मनाशी निश्‍चय केला. लांजा शहरात रिक्षा व्यवसाय करत असल्याने ओळख होतीच. गावातील नागरिकांना भाजीपाल्याची सुविधा पुरवायची तयारी केली. घरपोच सेवा दिली तर ग्राहकाची गैरसोय दूर होईल, हे ताडले. शेतीचा वाहतूक पास होताच. त्यामुळे राजाराम गुरव यांनी आपल्या रिक्षामध्ये भाजीपाला भरून वाडीवाडीमध्ये जाऊन विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

अजूनही म्हणावी तशी तालुक्‍यात एसटी सेवा सुरळीत न झाल्याने ग्रामीण नागरिक अनेक सोईसुविधांपासून वंचित आहेत. रिक्षाने भाजीपाला आणायला लांजा येथे जाण्यापेक्षा घरपोच भाजी मिळत आहे, याला जास्त पसंती देत आहेत. गुरव यांनी हा भाजी व्यवसाय ना नफा ना तोटा या भूमिकेतून सुरू केला आहे. सर्वसामान्यांना लांजा येथे जाऊन भाजीपाला घेऊन येणे परवडणारे नाही. तीच भाजी बाजारभावाने ते देत आहेत. आठवड्याचे दोन ते तीन दिवस भाजी विक्री करतात. 

"दळणवळणाची साधने सुरळीत होत नाहीत तोपर्यंत गावातील नागरिकांची सेवा करणार. नागरिक बाजारात जाऊन गर्दी करणार व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, हे ओळखून घरपोच सेवा देतोय."

- राजाराम गुरव

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT