lockdown positive impact in malvan 
कोकण

क्षणाचाही विचार न करता तिने मध्यरात्री गर्भवती महिलेस नेले रुग्णालयात : त्या दोघींना मिळाला जणू पुनर्जन्मच

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : कोरोना महामारीने जग बदलले आणि जगणंही ! माणसांचा संपर्क ही संपत आलाय. माणुसकी संपल्याच्या घटना समाज माध्यमातून व्हायरल होत असताना आपली जबाबदारी, कर्तव्यापलीकडे जाऊन काम करत पर जिल्ह्यातील प्रसूतीसाठी अडकलेल्या एका महिलेस जणू ‘पुनर्जन्म’ देण्याचे काम केले आहे.  मसुरे देऊळवाडा येथील आशासेविका सौ. अंकीता अनिल मेस्त्री यांनी. 

लॉकडाऊन लागण्यापूर्वी आंगणेवाडी येथे यात्रेनिमित्त आकाश पाळणे यांनी घेऊन आलेले कुटुंबीय अडकून पडले.मूळ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील  हे कामगार आहेत.  सुमारे 28 जणांना सध्या मसुरे देऊळवाडा येथील प्राथमिक शाळेत निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. याच कुटूंबातील एक 25 वर्षीय महिला सौ. कोमल राहुल भोसले या गरोदर असल्याने 8 मे ला रात्री 12 च्या सुमारास त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या.

कोरोनातही माणुसकीचा बंध घट्ट

याबाबतची माहिती रात्री 12.30 वाजता अंकिता मेस्त्री यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी रिक्षासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला .परंतु रिक्षा मिळण्यास उशीर झाला.  अंकिता  यांनी रिक्षाचा निर्णय बदलत पती अनिल यांना स्वतःची खासगी कार घेण्याचे सुचविले. मसुरे येथील बागवे हायस्कूलचे कर्मचारी असलेल्या अनिल यांनी क्षणाचाही विलंब न लावता या मेस्त्री दाम्पत्याने ठीक 12.55 ला त्या गरोदर महिलेला गाडीत घेत प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे गाठत दवाखान्यात दाखल केले. दरम्यान दवाखान्यात पोहचण्यापूर्वी त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केल्यामुने त्याठिकाणी डॉ. तृप्ती देसाई व सिस्टर पेडणेकर अगोदरच उपस्थित होत्या. गाडीतून उतरत दवाखान्यात दाखल होतानाच ठीक 12.58 मिनिटांनी त्या महिलेची सुखरूप प्रसूती झाली.

प्रसूतीसाठी अडकलेल्या महिलेस ‘पुनर्जन्म’

सांगोला येथील सौ. भोसले यांना कन्यारत्न प्राप्त झाले.केवळ दवाखान्यात दाखल करत आपली जबाबदारी संपली असा विचार न करता सौ. अंकिता व पती अनिल हे रात्री 2 वाजेपर्यंत तेथेच थांबून होते. यानंतर बाळाला आईच्या कुशीत दिल्यानंतरच ते डॉक्टर व कर्मचार्‍यांचे आभार मानत घरी आले. जीवनात वेळेला खूप महत्व असते. गेलेली वेळ कधीच भरून येत नाही. पर जिल्ह्यातील महिलेवर प्रसूतीच्या कठीण काळात अवघड वेळ आली होती. अशा अवघडलेल्या वेळी वेळेचे भान राखत आशासेविका सौ. अंकिता मेस्त्री यांनी आदर्श आणि अनुकरणीय कार्य सर्वांसमोर ठेवत त्या महिलेस जणू पुनर्जन्मच दिला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या कामाने वेगळा ठसा उमटविलेल्या आशासेविका सौ. अंकिता मेस्त्री यांचे भोसले परिवारासह सर्व कामगारांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar : मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल... 'या' बड्या बिझनेसमनने थेट राज ठाकरेंनाच दिले आव्हान

'जावेद अख्तर, आमिर खानसह दाढीवाले आणि गोल टोपी घालणारे लोक मराठी बोलतात का? मनसेच्या 'त्या' कृतीवर नीतेश राणेंचा संताप

Nandapur First Bus Service : नंदापूरमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच एसटी

Earless Boy Hears: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

SCROLL FOR NEXT