lockdown positive impact story in ratnagiri 
कोकण

डोर्ले गावचे यश ; 300 चाकरमानी येऊनही ना गोंधळ ना वाद...

सुधीर विश्‍वासराव

पावस (रत्नागिरी) : चाकरमान्यांचा डोर्ले गावातील ओघ वाढत असतानाच ग्रामपंचायत आणि ग्राम कृतिदलाने डगमगून न जाता चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यावर भर दिला. त्यासाठी गावातील बंद घरांवर लक्ष केंद्रित केले. एकमेकांमध्ये अंतर राखणे, मास्क वापरणे यासारख्या उपाययोजनांवर ग्रामपंचायतीने सर्वाधिक भर दिला. त्यामुळे शेकडो चाकरमानी येऊनही डोर्ले गाव कोरोनामुक्त ठेवणे शक्य झाले आहे.


रत्नागिरीत मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या चाकरमान्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाकडून ग्राम कृतिदल स्थापन करण्यात आले. त्या माध्यमातून कोविड-19 विरोधात युद्ध सुरू झाले. अनेक ग्रामपंचायती या युद्धात सहभागी झाल्या. रत्नागिरीतील ग्रुप ग्रामपंचायत डोर्ले देखील या युद्धात मागे नाही.

मुंबईतून येणारे चाकरमानी आपलेच आहेत ही भावना जपून त्यांची योग्य व्यवस्था डोर्ले ग्रामपंचायतीने केली. या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन करून त्यांची ग्रामपंचायतीने वेळोवेळी काळजी घेतली. त्यांची खाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना रेशन उपलब्ध करून दिले. जवळपास 300 चाकरमानी डोर्ले गावात दाखल झाले आहेत. गावातील बंद घर ताब्यात घेऊन तेथे चाकरमान्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले.

ग्राम कृतिदलाची उत्तम कामगिरी

सुदैवाने या गावात कोणीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. आशा सेविका ज्योती बिर्जे आणि कविता कुवार, अंगणवाडी सेविका पूजा पाटील, तृप्ती गुरव यांनी या काळात विशेष काळजी घेतली.डोर्ले-दाभिळ गावची लोकसंख्या 1 हजार 490 इतकी आहे. त्यांना सॅनिटायझरदेखील प्रत्येक कुटुंबाला वाटण्यात आले. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य सुशांत पाटकर, सरपंच शरयू पाटकर, उपसरपंच प्रकाश कुड, ग्रामसेवक प्रवीण चौधरी यांनी महत्वाची भूमिका बजावली. ग्राम कृतिदल समिती सदस्य, वाडी कृतिदल समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, उपकेंद्रातील आरोग्य खात्याचे कर्मचारी यांची साथ लाभली.

चाकरमान्यांना मास्कचे वाटप 
मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. आर्सेनिक अल्बम 30 या रोग प्रतिकारक गोळ्यांचे वाटपदेखील करण्यात आले. पाणी शुद्धीकरणासाठी लिक्विड देण्यात आले. सोशल डिस्टन्स आणि जमावबंदीचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. कुणी आजारी पडल्यास त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT