lockdown positive impact youth are emphasizing various arts in kokan 
कोकण

लॉकडाऊनचा सदुपोग - त्याने रेखाटली महात्म्यांची पोट्रेट...

नरेश पांचाळ

रत्नागिरी :  जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे सर्वांनाच झळ बसली आहे. पण काही महाविद्यालयीन तरुण विविध कलांना महत्व देत आहेत. टीव्ही, मोबाईलच्या आहारी न जाता विविध छंद जोपासत आहेत. असेच तालुक्‍यातील नाखरे-भगवतीवाडी येथील प्रणय संजय मेस्त्री या महाविद्यालयीन तरुणाने घरबसल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, मदर तेरेसा, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पेन्सिल वर्क हुबेहूब करून लॉकडाऊन कालावधीचा सदुपयोग केला. 

प्रणय रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एफवायबीएस्सीला असून रत्नागिरी-नाखरे असा त्याचा नेहमीचा प्रवास सुुरू असतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्यानंतर काय करावे? हा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्याचे वडील संजय मेस्त्री यांचा गावातच सुतारकाम व वेल्डिंगचा व्यवसाय आहे. गावात निर्मित होणाऱ्या घरांची कामे बिल्डिंग वर्क, सुतारकाम, वेल्डिंगचे काम करतात. या कामातही प्रणय त्यांना मदत करून कुटुंबाला हातभार लावतो. सध्या पावसाला सुरवात झाल्यानंतर त्याने शेतीची कामे आटोपल्यानंतर टीव्ही, मोबाईल या जगाच्या संपर्कात न राहाता पेन्सिल वर्कने पोट्रेट, संकल्पचित्र, विविध डिझाईन तयार केल्या आहेत. 


संवादिनी वादनाचे धडे 
चित्र रेखाटनाबरोबरच सुतारकाम, चिऱ्याचे बांधकाम तसेच शेतीकामही करतो. गणेश मूर्तीकलेतही त्याचा हात चांगला आहे. फावल्या वेळेत तो मूर्तीशाळेत जाऊन मूर्तीकाम करत होता; सध्या तो संवादिनी वादनाचे धडे घेत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Political: सत्तेचा नवा अध्याय, की महायुती?; सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने दावा केल्याने वाढली रंगत; कोण कोणासोबत, याची उत्सुकता!

Latest Marathi News Update : मुंबई पालिकेच्या दुसऱ्या सभेत विरोधी नगरसेवक आक्रमक

Brain Activity After Death : मृत्यूनंतर ऐकू येतात 'हे' भयानक शब्द, डॉक्टरांच्या संशोधनात थक्क करणारी माहिती समोर

नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

SCROLL FOR NEXT