lockdown positive story in ratnagiri
lockdown positive story in ratnagiri 
कोकण

मध्यरात्री फोनची ट्रिंग ट्रिंग वाजली की यांचे काम सुरु ; हे कोरोना वॉरिअर्स विशेष पथक घेत आहे असे ही श्रम...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला की रुग्ण खचतो. या परिस्थितीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी कोरोना वॉरिअर्समधील विशेष पथकाकडे सोपवण्यात आली आहे. गेली तीन महिने हे वॉरिअर्स दिवस-रात्र इमानेइतबारे काम करत आहे. मध्यरात्री फोन वाजला की त्या वॉरिअर्सची तारांबळ उडते. रुग्णापर्यंत पोचून त्याला दिलासा देत रुग्णालयात दाखल करेपर्यंतची भूमिका ही मंडळी बजावत आहेत.


जिल्हा परिषदेचे हे पथक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. या कोरोना वॉरिअर्संच्या पथकात अमित कोरगावकर, सुहास गुरव, तुषार साळवी, प्रदीप महाकाळ, अमर विचारे, रोहिणी किडये, शीतल कदम, जाई नहीवेकार यांचा समावेश आहे.
कोविड विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पथक रत्नागिरी तालुक्यात कार्यरत आहेत. एखाद्या रुग्णाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला की ते कार्यरत होते. दिवस असो किंवा रात्र, ऊन असो किंवा पाऊस जीवाची परवा न करता अगदी जयगडपासून गावखडीपर्यंत मिर्‍यापासून पालीपर्यंतच्या वेशीवर कार्यरत आहेत.

रुग्णापर्यंत पोहचलो की काम झाले असे होत नाही. त्या रुग्णाचीच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांशी आपूलकीने समजूत काढत त्यांना बाधित रुग्णाला घरातून सहजपणे रुग्णालयात आणावे लागते. रुग्णाला आणताना या पथकाला अनेकदा अडचणी सामोरे जावे लागते. पण त्या परिस्थितीवर मात करत संयमाने हे कोरोना वॉरिअर्स् काम करत आहेत. रुग्णाबरोबर गोड बोलून, लहान मुलांप्रमाणे त्यांची समजूत काढून धीर देण्याचीही जबाबदारी हेच वॉरिअर्स् लिलाया पार पाडत आहेत. त्यामुळे गेल्या तिन महिन्यात रत्नागिरीत आढळलेल्या रुग्णांकडूनही तक्रार आलेली नाही. रुग्णाबरोबर कुटुंबातील लोकांना क्वारंटाईन करणे, त्यांना आवश्यक वस्तू पोचवणे ही कामेही तेच करतात.


कोरोना विषाणूने प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बाधितांना आणत असतानाच यावॉरिअर्सनाही तेवढीच खबरदारी घ्यावी लागते. रुग्णापासून सात फूट लांब राहून काम करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर, रुग्णाला पीपीईटी किट मधूनच रुग्णालयात घेऊन जाणे आदी बाबींची पूर्तता केली जाते. त्यातुनही बाधिताच्या संपर्कात येत असल्यामुळे आपल्यालाही कोरोना होऊ शकतो याची भिती मनात राहतेच. हे वॉरिअर्स स्वतःची कपड्यांची बॅग घेऊनच बाहेर पडतो. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात 70 बाधित रुग्णांना या पथकाने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अत्यावश्यक परिस्तिथीत जेवण आणि कपडे देखील उपलब्ध करून दिले आहेत. या मागची या पथकातील प्रत्येक व्यक्तीची भावना इतकीच आहे की आम्हाला प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे.

कोरोना बाधितांना जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी 15 मार्चपासून हे कोरोना वॉरिअर्स् झटत आहेत. बाधितांच्या संपर्कात येत असल्यामुळे त्या वॉरिअर्स्ची थर्मल स्कॅनिंगसह आरोग्य तपासणी केली जाते. गेल्या तीन महिन्यात या वॉरिअर्स्नी काळजी घेऊन काम केले आहे.

- डॉ. महेश गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT