lok sabha election 2024 result Uddhav Thackeray Shiv Sena got success in Mumbai but lost in Paschim Maharashtra Konkan marathi News  
कोकण

Lok Sabha Election 2024 : ठाकरेंचा मुंबईत वरचष्मा, मात्र कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार

Maharashtra Lok Sabha Election 2024 : मुंबईत चारपैकी तीन जागा राखत मुंबई ठाकरेंचीच यावर शिक्कामोर्तब केले असले तरी कोकणातून शिवसेना मागच्या चार निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच हद्दपार झाली असल्याने ठाकरेंना हा मोठा धक्का आहे.

- दीपा कदम

दोन वर्षांपुर्वी शिवसेनेमध्ये अभुतपूर्व फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली. त्यानंतर शिवसेना (उध्द्वव बाळासाहेब ठाकरे) हे नवीन नाव आणि मशाल या चिन्हासह शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत राखेतून भरारी घेत यशाला गवसणी घातली आहे. विशेषत: मुंबईत चारपैकी तीन जागा राखत मुंबई ठाकरेंचीच यावर शिक्कामोर्तब केले असले तरी कोकणातून शिवसेना मागच्या चार निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच हद्दपार झाली असल्याने ठाकरेंना हा मोठा धक्का आहे.

शिवसेनेची संपुर्ण वाताहत आणि पक्षाची संपुर्ण व्यवस्था विस्कळीत झाल्याने शिवसेना ठाकरे गट पुन्हा उभा राहणार की नाही0 पक्षफुटीनंतर ठाकरे गटाला खरोखरच सहानुभूती आहे का0 यावर शंका उपस्थित केल्या जात होत्या. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने या सर्व प्रश्नांची उत्तरे ठाकरेंच्या बाजूने दिली असून ठाकरेंच्या शिवसेनेला ठाकरेंच्या जीवदान दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढच्या काळातही ठाकरेंच्या शिवसेनेची भुमिका महत्त्वाची राहणार असून राज्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला मानाचे स्थान असणार आहे.

प्रथमच मशाल चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाणार्या शिवसेना ठाकरे गटाने २१ जागांपैकी ९ जागा जिंकत स्ट्राईक रेट उत्तम ठेवलाच. शिवाय शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गटांमध्ये झालेल्या लढतीत सर्वाधिक जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली, नाशिक, उस्मानाबाद, परभणी आणि शिर्डी या सात जागा थेट शिंदे गटासोबतच्या थेट लढतीत जिंकून ठाकरे गटाने शिवसेना ठाकरे गटाने आपला वरचष्मा राखला आहे.

मुंबईवर ठाकरेंनी आपली पकड कायम ठेवली. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि प्रथमच ईशान्य मुंबईची लोकसभेची जागा देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने अपेक्षेप्रमाणे राखली. मात्र कोकणातून मागच्या चार लोकसभेत प्रथमच कोकणात एकही जागा शिवसेनेची आलेली नाही, हा मोठा धक्का उध्द्वव ठाकरेंना मानला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील शिवसेना ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकलेली नाही. हातकणंगलेमधून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि सांगलीमधून चंद्रहार पाटील यांचाही पराभव झाल्याने कोकणासोबत पश्चिम महाराष्ट्रातही ठाकरे गटाला खाते उघडता आलेले नाही.

महाविकास आघाडीसोबत २०१९ पासून धरोबा केलेल्या शिवसेनेला मागच्या दोन वर्षात केवळ ठाकरेंची शिवसेना इथपर्यंत आणून सिमित केले. त्यानंतर न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाचा नाव, चिन्हासाठीचा लढा. त्याचबरोबर पक्षाची नव्याने बांधणी, नेत्यांमागील ईडी, सीबीआयचा ससेमिरा यातून मार्ग काढत उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज्य पिंजून काढले. भाजपसमोर त्यांनी आव्हान उभे केले आहे. महाविकास आघाडीला ३० पर्यंत मिळालेल्या जागांमागे उध्दव ठाकरे यांचे श्रेय फार मोठे आहे. काँग्रेसचे राज्यात प्रभावी नेतृत्व नसतानाही ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारात रंगत आणली.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा यापुढचा कस खरेतर मुंबई महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत लागणार आहे. या निवडणुका किती चुरशीच्या होतील याचे बीज लोकसभा निवडणुकीच्या निकालात आहे.

शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडलेल्या खासदारांना मतदार धडा शिकवतील असा एक अंदाज व्यक्त केला जात होता. सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी दिलेल्या प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांना खासदारकी वाचवण्यात यश मिळाले आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT