Lokmanya Tilak Memorial Reading Temple Teacher Rambhau Sathe Donation of Rs 21 lakhs chiplun
Lokmanya Tilak Memorial Reading Temple Teacher Rambhau Sathe Donation of Rs 21 lakhs chiplun sakal
कोकण

चिपळूण : लोटिस्माला २१ लाखांची देणगी; साठे कुटुंबीयांची बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला तालुक्यातील मालघर येथील नामवंत शिक्षक (कै.) रामभाऊ साठे यांच्या स्मृत्यर्थ रामभाऊ साठे यांच्या मुलांनी एकवीस लाख रुपयांची देणगी दिली आहे. वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात साठे कुटुंबीयांच्या वतीने लेखिका सौ. संध्या साठे जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्याकडे २१ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. रामभाऊ साठे हे शिक्षण क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व होते. रामपूर येथील मिलिंद हायस्कूलमध्ये त्यांनी मुख्याध्यापक पद भूषविले होते. निवृत्तीनंतर त्यांनी मालघर येथे गुरुकुल माध्यमिक शाळा सुरू केली.

निवृत्तीनंतरही वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत म्हणजे ३० वर्षे साठे हे त्या शाळेत अध्यापन करीत होते. या शाळेने अनेक उपक्रम सरकारी पातळीवर ते सुरू होण्याआधी केले होते. पोषण आहार, वृक्षलागवड किंवा विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण यासारखे उपक्रम शाळेने राबवले. त्यामागे साठे यांची दृष्टी होती. गावातील मुली शिक्षण्यावर त्यांचा कटाक्ष होता. मुलींना त्याकाळात सायकली देऊन त्या चालविण्याचेही शिक्षण देण्यात आले होते. जिल्ह्यातील द्रष्टा शिक्षक अशी रामभाऊ साठे यांची ओळख होती. वाचनाची आवड आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.

रामभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांनी ग्रंथालयाला एकवीस लाख रुपयांची देणगी दिली, त्यावेळी संस्थेचे कार्यवाह विनायक ओक, कोषाध्यक्ष, राम दांडेकर, राष्ट्रपाल सावंत, मनिषा दामले, मधुसूदन केतकर, संजय शिंदे, अविनाश पोंक्षे आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला दिलेल्या देणगीबद्दल वाचनालयाच्या पुरस्कार समितीचे प्रमुख अरुण इंगवले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रकाश देशपांडे यांचे प्रयत्न

२२ जुलैला चिपळुणात आलेल्या महापुराने लोटिस्माने मोठ्या हिकमतीने उभारलेल्या कोकणातील एकमेव अशा वस्तूसंग्रहालयाची वाताहत झाली होती. सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरल्यावर प्रकाश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली वस्तूसंग्रहालय आणि वास्तू उभारणी यासाठी पुनश्‍च हरि ओम करण्यात आला. या उभारणीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रामभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांनी ही देणगी दिली आहे.

सुनियोजित कामकाज हे त्यांचे वैशिष्ट्य

चिपळूण आणि गुहागर तालुक्यांतील रामपूर, भोम, मार्गताम्हाने, ओमळी, जामसूद, पाटपन्हाळे, हेदवी, गुणदे आदी ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आमदार (कै.) तात्यासाहेब नातू यांच्यासोबत रामभाऊंचा मोलाचा वाटा होता. अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित कामकाज हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT