कोकण

Loksabha 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये २२ अर्ज दाखल

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी नऊ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत १३ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले. उद्या (ता. ५) अर्जांची छाननी असून ८ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 
येथून काँग्रेसचे नवीनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय शरद गांगनाईक यांनी आज अर्ज दाखल केला.

ते पनवेल मतदारसंघातील मतदार यादीत आहेत. महायुतीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांच्या नावाशी साम्य असलेल्या विनायक लवू राऊत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरला आहे. पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर, नीलेश भिकाजी भातडे, नारायण दशरथ गवस यांनी अपक्ष म्हणून तर बहुजन मुक्ती पार्टी पक्षाचे उमेदवार भिकुराम काशिराम पालकर यांनी अर्ज दाखल केला.

दाखल उमेदवारांबरोबर महायुतीचे उमेदवार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नीलेश राणे, महाआघाडीकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, बहुजन वंचित आघाडीकडून मारुती ऊर्फ काका जोशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राजेश जाधव, बहुजन समाज पार्टीचे किशोर वरक, अखिल भारत हिंदू महासभेचे अजिंक्‍य धोंडू गावडे असे १३ उमेदवार रिंगणात आहेत. 

पाचजणांचे शस्त्र परवाने रद्द
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने पाच जणांचे आत्मसंरक्षण शस्त्र परवाने रद्द करून शस्त्र जमा केली. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. बुरंबी (ता. संगमेश्‍वर) अनंत भागोजी भाताडे, कडवई येथील महेंद्र ऊर्फ राजन नारायण कापडी, कसबा येथील राजेंद्र विष्णू महाडिक, नावडीतील सुनील श्रीकांत सुर्वे आणि कुळ्ये वाशी येथील चंद्रकांत अमृत जाधव या पाच जणांची आत्मसंरक्षण शस्त्र परवाने रद्दची कारवाई प्रशासनाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT