loss of billions due to heavy rain in chiplun 
कोकण

चिपळुणला वादळाचा जोरदार तडाखा ; कोट्यावधींचे नुकसान  

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - तालुक्यातील दहा गावांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. वादळी वारा व पावसाच्या तडाख्यात 100 घरांचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील 184 शेतकर्‍यांच्या 68 हेक्टवरील शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरगाव-चिवेली परिसरात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक नागरिकास घरी थांबण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. उद्योग व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वादळी वारा आणि पावसाचा तडाखा बसला. वेगवान वार्‍याने अनेकांच्या घरातील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी मोठी झाडे कोसळून ती घरावर पडली. परिणामी घरांचे पत्रे, कौले कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. 

यामध्ये तालुक्यातील बोरगाव, बामणोली, करंबवणे, तळवडे, कोळकेवाडी, भिले, कालुस्ते बु, चिवेली, खडपोली, कळकवणे या गावातील घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बोरगाव येथील 61 घरांना आणि 2 गोठ्यांना वादळी वार्‍याचा तडाखा बसला. त्यामुळे 4 लाख 88 हजार 525 रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर बामणोली येथील 15 घरे व 5 गोठ्यांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाहणी केली आहे. त्यानुसार तालुक्यात सुमारे 8 लाखाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यात दीर्घकाळानंतर वादळी पावसात गारांचा वर्षाव झाला. या गाराही मोठ्या होत्या. त्यामुळे शेतीलाही या वादळाची बाधा झाली. बोरगाव येथे 10 हेक्टर, भिले 12, कालुस्ते बु. 4, कालुस्ते खुर्द 7, तर धामेली 8 हेक्टर असे तालुक्यात एकूण 68 हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये 184 शेतकर्‍यांना शेतीचे नुकसान सोसावे लागले आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच अवकाळी पावसाचा तडाखा तालुक्याला बसला आहे. कोरोनामुळे हलाखीत असलेल्या ग्रामस्थांना अवकाळी पावसाने आणखी संकटात टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT