Lost Licence Got Through Facebook Ratnagiri Marathi News  
कोकण

विसरलेले लायसन्स मिळाले फेसबुकमुळे, कसे ? 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - ऑनलाइनच्या जमान्यात अनेक गोष्टी थेट मोबाईलवरून मागवल्या जातात. तसंच हरवलेली व्यक्ती, वस्तू यांचीही माहिती काही क्षणात दूरवर पोचवणारा हा सोशल मीडिया दोन भावांसाठी खूपच उपयुक्त ठरला. काही दिवसांपूर्वी दुकानात विसरलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती फेसबुकवरून मिळाली आणि काही तासातच त्यांनी स्वतः ती दुकानातून ताब्यात घेतली. 

समाजात वाईट बातम्या पसरवण्यासाठी अग्रेसर राहण्यापेक्षा सोशल मीडियाचा वापर एखाद्याच्या मदतीसाठी करणं ही काळाची गरज आहे. याचा उत्तम उपयोग दुकानदार व महिला सामाजिक कार्यकर्तीने केला. शहरातील अभ्युदयनगर येथे सुनील गांगण यांचे समर्थ जनरल स्टोअर्स असून अलीकडे त्यांनी झेरॉक्‍सची सेवाही उपलब्ध करून दिली. याच दरम्यान त्यांच्याकडे शुभम पालकर (रा. सन्मित्रनगर), शरद हातफले आणि संतोष हातफले (साठरे बांबर, कशेळी) यांचे लायसन्स झेरॉक्‍स काढल्यानंतर दुकानात राहिले. त्यांनी ही तिन्ही लायसन्स जपून ठेवली होती.

या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सोनाली सावंत या गांगण यांच्या मुलीचे वाटेत पडलेले शाळेचे आयकार्ड परत देण्यासाठी गेल्या असता तिथे त्यांना या लायसन्सविषयी समजले. त्याचे फोटो काढून सावंत यांनी व्हॉटस्‌ऍपवर पाठवले. फेसबुकवर हातफले यांचे नाव शोधून त्यांना या लायसन्सबाबत मेसेज केला. काही तासांतच हातफले पत्ता शोधत गांगण यांच्या दुकानात पोहोचले आणि त्यांची दोन्ही लायसन्स परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत आभार मानले. अशाच प्रकारे शुभम पालकर, सन्मित्रनगर याचे लायसन्स त्याच्यापर्यंत लवकर पोहोचावे यासाठी गांगण आणि सावंत प्रयत्न करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT